सरपंच हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट, वाल्मिक कराडविरोधात मोठी कारवाई

Walmik Karad arms license cancelled

Walmik Karad | बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या महिन्यात 9 डिसेंबररोजी हत्या करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक झाली आहे. तर, एक आरोपी अजूनही फरार आहे. एसआयटी आणि सीआयडीकडून याचा तपास सुरू आहे. या हत्या प्रकरणात बीडचा वाल्मिक कराड हा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. बीडमधील आवादा कंपनीकडे 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी कराडला (Walmik Karad) अटक झाली आहे. त्याच्यावर सरपंच हत्ये प्रकरणात देखील आरोप करण्यात येत आहेत.

अशात कराड विरोधात एक मोठी कारवाई झाल्याची माहिती आहे. वाल्मिक कराड याचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात अनेक तरुणांचे बंदूक हातात घेताना, बंदुकीतून गोळ्या झाडतानाचे फोटो मागे व्हायरल झाले होते. बीडमध्ये कित्येक जणांना बंदूक परवाने देण्यात आल्याची धक्कादायक माहितीच मागे उघड झाली होती. यानंतर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बंदुकीसोबत ज्या कोणाचे फोटो आहेत, त्यांचे परवाने रद्द करा, असे आदेश दिले होते.

वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द

यानंतर आता दोन आठवड्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल 100 जणांना शस्त्र परवाना रद्द करण्याची नोटीस पाठवली आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज सर्वात मोठी कारवाई केली आहे. तसेच निलंबित झाल्यानंतर ही शस्त्र सापडल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची देखील माहिती आहे.

यामध्ये वाल्मिक कराड याचा देखील शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज ही मोठी कारवाई केली. दरम्यान, वाल्मिक कराडचा (Walmik Karad) आणखी एक धक्कादायक कारनामा उघड झाला आहे. वाल्मिक कराडने ऊसतोड शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे.

कराडने 140 शेतकऱ्यांची फसवणूक केली

सोलापूरमध्ये कराडने 140 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ऊस तोडणी यंत्राचे 36 लाख रूपये शासकीय अनुदान मिळवून देतो असं सांगत वाल्मिक कराडने (Walmik Karad) प्रत्येक ऊस तोडणी यंत्र मालकाला आठ लाख रूपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांना 11 कोटी 20 लाख रूपयांनी कराडने गंडवले असल्याचं समोर आलंय.

ऊस तोडणी यंत्र मालक दिलीप नागणे यांनी हा गंभीर आरोप केलाय. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सह्याद्री अतिथी गृहावर स्वतः मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना भेटल्यानंतर 8 लाख रुपये दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. या शेतकऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. यामध्ये कराड (Walmik Karad) देखील दिसून येतोय.यामुळे कराड पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

News Title : Walmik Karad arms license cancelled

महत्त्वाच्या बातम्या-

परळीत आणखी एका सरपंचचा मृत्यू, सर्वत्र एकच खळबळ

‘त्या’ फोनबाबत विष्णु चाटे तोंड उघडेना; CID कडून अजूनही तपास सुरूच

ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा 80 हजारांवर?, जाणून घ्या आजचे दर

हार्ट अटॅक नव्हे तर…टिकू तलसानिया यांना झालंय तरी काय?; प्रकृती अत्यंत नाजुक

दिवसाची सुरुवात आनंदवार्ताने, पेट्रोल-डिझेलचे दर ‘इतक्या’ रुपयांनी घसरले?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .