अजितदादांच्या ताफ्यामध्ये वाल्मिक कराडची गाडी! शरद पवारांच्या नेत्याचा गंभीर आरोप

Ajit Pawar

Ajit Pawar l संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. कारण बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी सर्वात मोठा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मस्साजोग गावात संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र त्यावेळी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी असल्याचा धक्कादायक आरोप बजरंग सोनावणे यांनी केला आहे.

खासदार बजरंग सोनवणे यांचा मोठा दावा :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, 12 डिसेंबरला वाल्मीक कराड आणि पोलीस यंत्रणा यांची एका नेत्याच्या कार्यालयात भेट झाली. त्यानंतर 15 डिसेंबरला महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला आरोपी वाल्मिक कराड नागपूरमध्ये हजर होता असा मोठा आरोप खासदार बजरंग सोनावणे यांनी केला आहे.

याशिवाय वाल्मिक कराडचा प्रवास हा पहिल्यांदा परळी मग पुणे त्यानंतर गोवा आणि पुन्हा पुणे असा सुरु असताना पोलीस त्यावेळी काय करत होते? असा सवाल खासदार बजरंग सोनावणे यांनी विचारला आहे. मात्र आता बजरंग सोनवणे यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Ajit Pawar l बजरंग सोनवणे काय म्हणाले? :

“उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी 16 डिसेंबरला मस्साजोगला आले, त्यावेळी त्यांच्या ताफ्यामध्ये गाडी होती. तसेच त्या गाडीत हा आरोपी होता, तो तिथे जाऊन सरेंडर होतो. मग याचा अर्थ काय? तसेच मस्साजोगला देखील ती गाडी होती. त्याच गाडीमधून आरोपी जाऊन शरणगती देत आहे. तसेच ती गाडी कोणाच्या नावावर आहे?” असा सवाल बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केला आहे .

दरम्यान, “मे महिन्यात जो गुन्हा दाखल होता, त्यावेळी जर कारवाई झाली असती तर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती. तसेच पोलिसांनी देखील वेळीच गुन्हा दाखल केला असता तर हे सगळं झालं नसतं” असा दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे.

News Title : Walmik karad car in deputy cm ajit pawar convoy

महत्त्वाच्या बातम्या-

छगन भुजबळ भाजपमध्ये कधी प्रवेश करणार? महत्वाची माहिती समोर

सरपंच हत्ये प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले देशाबाहेर फरार?, मोठी अपडेट समोर

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खुलासा होणार?, SIT मध्ये ‘या’ मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश

बीड पोलीस ठाण्यात आणले 5 पलंग, रोहित पवारांनी कराड कनेक्शन असल्याचा केला आरोप!

‘हळूहळू टीव्ही, एसी असं सगळंच…’; वाल्मिक कराडला तुरुंगात मिळतेय VIP ट्रीटमेंट?

.

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .