Walmik Karad | गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड हे नाव सगळ्यांनाच माहित झालंय. बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मुख्य आरोपी म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड, सध्या पोलीस कोठडीत आहे. या पार्श्वभूमीवर, कॉँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी एक धक्कादायक दावा केला आहे ज्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
वाल्मिक कराडचा एन्काऊंटर?
वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा दावा विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी केला आहे. या प्रकरणात कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, ज्यामुळे त्याच्या एन्काऊंटर होण्याची भीती वाढली आहे. वड्डेटीवार यांनी या प्रकरणात पारदर्शकता आणि न्याय तपास करण्याची मागणी केली आहे.
माध्यमांशी बोलत असताना विजय वड्डेटीवार म्हणाले, “वाल्मिक कराडचं (Walmik Karad) एन्काऊंटर होऊ शकतं, ही माहिती एका बड्या अधिकाऱ्याने मला दिली आहे. हे खूप गंभीर आणि चिंताजनक आहे. राज्यातील राजकीय वातावरणात असा गोंधळ सुरु आहे ज्यामुळे न्याय तपास होण्याची शक्यता कमी आहे.” त्यांनी या प्रकरणात न्यायालयाचे हस्तक्षेप करण्याची मागणी देखील केली आहे.
आकाला वाचवण्यासाठी एन्काऊंटर करू नका
पुढे वड्डेटीवार यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की वाल्मिक कराडचा (Walmik Karad) एन्काऊंटर करून आकाला वाचवण्याचा प्रयत्न करू नये. हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि यात तपास होणं आवश्यक आहे. एन्काऊंटरसारख्या मार्गाने जाणं हे न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. यावेळी पोलीस ठाण्यातील 5 पलंगावरून देखील सरकारवर निशाणा साधला आहे, बोलत असताना वडेट्टीवार म्हणाले की, वाल्मिक कराड याचे लाड पुरवले जात आहेत. त्याच्यासाठी पोलीस ठाण्यात बेड आले. पोलीस आतापर्यंत कधी कॉटवर झोपले नाही. मग हे कोणाचे लाड करत आहे. याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
News Title : walmik-karad-encounter-claims-vijay-wadettiwar
महत्त्वाच्या बातम्या-
लाडकी बहीण योजनेसंदर्भात फडणवीस सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय!
संतोष देशमुख हत्या प्रकरणात ठाकरे गटाने केली सर्वात मोठी मागणी!
अजितदादांच्या ताफ्यामध्ये वाल्मिक कराडची गाडी! शरद पवारांच्या नेत्याचा गंभीर आरोप
भुजबळांच्या मंत्रीमंडळ एंट्रीसाठी धनंजय मुंडेंची विकेट?, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
छगन भुजबळ भाजपमध्ये कधी प्रवेश करणार? महत्वाची माहिती समोर