Walmik Karad | बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची सीआयडी कोठडीत प्रकृती बिघडल्याचं समोर आलं आहे. वाल्मिक कराडने मंगळवारी पुणे सीआयडीसमोर शरणागती पत्करल्यानंतर, त्याला न्यायालयाने 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली होती.
दरम्यान, कराडची प्रकृती बिघडली आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याचं समोर आलं. वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केल्यानंतर, त्याची शुगर वाढल्याचं समजलं. यामुळे त्याला काही वेळ ऑक्सिजन लावावं लागलं.
काय आहे प्रकरण?
वाल्मिक कराडला (Walmik Karad) बुधवारी रात्री दीड वाजता केज न्यायालयातून बीड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली, त्यानंतर त्याची तपासणी केल्यानंतर, त्याची शुगर वाढल्याचं समजलं. कराडला मधुमेहचा त्रास असल्यामुळं त्याची प्रकृती बिघडली. त्याने रात्री जेवण केलं नव्हतं आणि सकाळीही त्यानी चहा किंवा नाश्ता घेतला नाही. त्याने फक्त सकाळी 11.30 वाजता सरकारी जेवण घेतलं, ज्यात त्याने साधारण अर्धी चपाती खाल्ली होती. त्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांनी त्याला ऑक्सिजन मास्क लावला होता.
वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, परंतु सीआयडीने त्याच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याचं आश्वासन दिलं आहे. सीआयडीचे एसपी बीड शहर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाले आहेत आणि त्यांनी वाल्मिक कराडची चौकशी सुरु केली आहे. त्याच्या आरोग्याची नियमित तपासणी करून त्याला आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येत आहेत.
प्रकृती बिघडल्याचं सोंगं?
आजारी आरोपीची चौकशी करताना तपास अधिकारीही काहीसे सौम्य वागतात. शिवाय चौकशीचे कठोर उपायही करण्यात मर्यादा येतात. चौकशी होऊच द्यायची नाही यासाठी वाल्मिकनं आजारपणाचा फंडा निवडला असावा असं सांगण्यात येतंय. सीआयडी कोठडीत चौकशीचे खास ठेवणीतले उपाय केले जातात. तो प्रयोग होऊ नये म्हणून वाल्मिक आधीच आजारी पडल्याचं सोंग घेऊ शकतो. वाल्मिकला बीपी आणि डायबिटीज आहे. त्यामुळं तपासअधिकारी अधिक कठोर वागणार नाही असं वाल्मिकला वाटू शकतं.
News Title : walmik-karad-health-problems-in-cid-custody
महत्त्वाच्या बातम्या-
झटपट वजन कमी करण्यासाठी ‘ही’ गोष्ट ठरते फायदेशीर!
‘या’ कारणांमुळे वाल्मिक कराडला 15 दिवसाची कोठडी!, सरकारी वकिलांकडून गौप्यस्फोट
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार? बड्या नेत्यानी केलं वक्तव्य
मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना गंभीर इशारा, म्हणाले…
वाल्मिक कराडच्या गुन्ह्यांची कुंडली आली समोर! 25 वर्षात तब्बल ‘इतके’ गुन्हे दाखल