‘वाल्मिक कराडच…’; सुप्रिया सुळेंचा अत्यंत गंभीर आरोप

Walmik Karad is Mastermind Supriya Sule Serious Allegation

Supriya Sule | सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याकांडातील मुख्य सूत्रधार खंडणीखोर वाल्मिक कराड असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच, या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. (Supriya Sule)

‘दोन लोकांनी राज्याची वाट लावली’

सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “वाल्मिक कराडचे नाव आरोपपत्रात आल्याचे मला आश्चर्य वाटत नाही. बीडमध्ये (Beed) अमानुष पद्धतीने खून झाला आहे. या व्यक्तीची हिंमत कशी झाली? कुणीतरी मोठी व्यक्ती त्यांच्या मागे असल्याशिवाय एवढा अंदाधुंद कारभार होऊच शकत नाही.”

“७०-७५ दिवस झाले तरी कृष्णा आंधळे नावाचा आरोपी फरार आहे. तो सापडत का नाही? राज्यात नसेल तर परराज्यात आहे का? केंद्रीय गृहमंत्रालयाशी संपर्क साधला का? एक सातवा आरोपी इतके दिवस फरार कसा राहू शकतो?”, असे प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले.

सुप्रिया सुळे यांनी सुरेश धस यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत, “सुरेश धस आणि वाल्मिक कराड यांची कधीच भेट झाली नाही, असे धस म्हणाले होते. दिवस जात आहेत, तसे त्यांच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब होत आहे. बीडमधील खून, भ्रष्टाचार, खंडणी, पीक विम्यातील फसवणूक, हार्वेस्टरमधील घोटाळा, घरगुती हिंसाचार अशा अनेक गुन्ह्यांमध्ये यांचा सहभाग दिसतो.” असा आरोप केला.

दहशत मोडून काढायची आहे

“महादेव मुंडे, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला मी भेटले. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील मीडियाचे (Media) आभार मानते की, त्यांनी या तिन्ही कुटुंबांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले. आपल्या सर्वांना मिळून ही दहशत मोडून काढायची आहे,” असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. (Supriya Sule)

Title : Walmik Karad is Mastermind Supriya Sule Serious Allegation

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .