Walmik Karad l खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची न्यायालयीन कोठडी वाढण्याची (Walmik Karad judicial custody extended) शक्यता आहे. वाल्मिक कराडची न्यायालयीन कोठडी १४ दिवसांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तपासी यंत्रणांनी पोलीस कोठडी मागितली नसेल तर न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपीची दर १४ दिवसांनी पोलीस कोठडी ही आपोआप वाढते. तपासी यंत्रणांकडून आरोपीच्या पोलीस कोठडीची आज मागणी करण्यात आली नाही, अशी माहिती देखील समोर आली आहे.
वाल्मिक कराडची न्यायालयीन कोठडी वाढणार? :
न्यायालयाच्या नियमित प्रक्रियेप्रमाणे आज वाल्मिक कराड याची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांची ९ डिसेंबरला केज तालुक्यात निर्घृणपणे हत्या झाली होती. वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून ही हत्या झाली, असा आरोप झाला होता. अशातच आता वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
Walmik Karad l धनंजय देशमुख यांचा गंभीर आरोप :
बीड विशेष न्यायालयाने २२ जानेवारी रोजी कराडला १४ दिवसांची कोठडी सुनावली होती. आज या कोठडीची मुदत संपत आहे. अशातच कराडला आज कोर्टात हजर न करताच त्याच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. “संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठीच गेली दोन महिने आरोपी फरार आहे. यात जर काही पुरावे नष्ट करण्यात आले तर त्यांची जबाबदारी ही यंत्रणा आणि प्रशासनाची असेल,” असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांचा धक्कादायक आरोप :
दरम्यान, फरार आरोपी कृष्णा आंधळे कुठेही गेलेला नसून त्याला लपवून ठेवण्यात आल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. “निवडणुकीआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड आपल्या भेटीला आले होते,” असा खळबळजनक दावा मनोज जरांगे यांनी केला होता. “रात्री २ वाजता ते माझ्या भेटीला आले, त्यांच्यासोबत वाल्मिक कराडही होता. त्यांनी कराडची ओळख करून दिली आणि मला सांभाळून घेण्याची विनंती केली,” असे जरांगे यांनी म्हटले होते.