Santosh Deshmukh Murder Case l बीडच्या (Beed) मासाजोगचे (Masajog) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सीआयडीने (CID) दाखल केलेल्या १८०० पानी आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. तसेच, सिद्धार्थ सोनावणे (Siddharth Sonawane) आणि रणजित मुळे (Ranjit Mule) यांची नावे वगळण्यात आली आहेत.
दोन महिन्यांत आरोपपत्र दाखल :
सीआयडीने अवघ्या दोन महिन्यांत तपास करून १८०० पानांचे आरोपपत्र तयार केले आहे. त्यात संतोष देशमुख यांच्या हत्येची सविस्तर माहिती देण्यात आली असून, ही संघटित गुन्हेगारी असल्याचे नमूद केले आहे.
सिद्धार्थ सोनावणे आणि रणजित मुळे यांच्याविरोधात कोणतेही पुरावे न सापडल्याने त्यांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे सिद्धार्थ सोनावणे माफीचा साक्षीदार होण्याची शक्यता आहे.
Santosh Deshmukh Murder Case l हत्येचे व्हिडीओ रेकॉर्डिंग (Video recording) :
९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली. सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याने देशमुख यांना केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले होते. या व्हिडीओच्या आधारे सीआयडीने आरोपपत्रात घटनेचे वर्णन केले आहे.
खंडणीसाठी हत्या :
संतोष देशमुख दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात सतत अडथळा ठरत होते, म्हणून त्यांची हत्या करण्यात आली, अशी माहिती वाल्मिक कराडच्या रिमांड रिपोर्टमध्ये (Remand report) बीडच्या कोर्टात (Court) सीआयडीने दिली होती. हाच घटनाक्रम आणि माहिती आता सीआयडीने आरोपपत्रात नमूद केली आहे. वाल्मिक कराडने या प्रकरणात कशी भूमिका निभावली, विष्णू चाटेचा (Vishnu Chate) काय सहभाग होता आणि घुलेने अपहरण कसे केले, याचे वर्णन आरोपपत्रात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
News title : Walmik Karad Mastermind in Sarpanch Santosh Deshmukh Murder Case; Two Names Dropped