Walmik Karad | बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. हत्या आणि खंडणी प्रकरणी मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याला 31 डिसेंबररोजी अटक करण्यात आली आहे. पुण्यात कराड स्वतः पोलिसांना शरण गेला. तो स्वतः शरण आल्याने विरोधी पक्षाकडून पोलीस तपासावर संशय व्यक्त केला जातोय. आरोपी स्वतः सरेंडर होत असेल तर मग पोलीस यंत्रणा काय करतेय?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. (Walmik Karad )
अटक केल्यानंतर कराडला बीडमधील केज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टाने कराडला पोलीस कोठडी सुनावली आहे. वाल्मिक कराडला 15 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.त्याला बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी आता एसआयटी देखील स्थापन करण्यात आली. अशात महाविकास आघाडीच्या एक बड्या नेत्याने अत्यंत धक्कादायक दावा केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
कॉँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग आणण्यात आले, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या प्रकरणी अत्यंत खळबळजनक दावा केलाय. माध्यमांशी बोलताना त्यांनी कराडबाबत मोठा दावा केलाय.
विजय वड्डेटीवार यांनी वाल्मिक कराडचे एन्काऊंटर होऊ शकते, असं वक्तव्य केलंय. पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड याचे लाड पुरवले जात आहेत. त्याच्यासाठी पोलीस ठाण्यात बेड आले. पोलीस आतापर्यंत कधी कॉटवर झोपले नाही. मग हे कोणाचे लाड करत आहे. याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. (Walmik Karad )
विजय वडेट्टीवार यांची मोठी मागणी
इतकंच नाही तर, आरोपीचे लाड पुरवण्याची ही सुरुवात आहे, हळूहळू टिव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेल मधील जेवण सगळच मिळेल, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला. कराडवर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने कराड वर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी. कराड वर अजून ही संतोष देशमुख हत्या असो की मकोका अंतर्गत गुन्हा ही दाखल झालेलं नाही, त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. (Walmik Karad )
News Title : Walmik Karad may encounter claims Vijay Wadettiwar
महत्त्वाच्या बातम्या-
“हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक होते पण महाराष्ट्रात…”; ‘या’ नेत्याचा हल्लाबोल
नवीन वर्षात सोनं स्वस्त झालं की महाग?, काय आहेत सध्या ग्रॅमचे दर?
सरकारला कोटींचा चुना लावत GFवर उधळले पैसे; अखेर ‘तो’ आरोपी अटकेत
सरपंच हत्या प्रकरणी फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय!
श्री स्वामींच्या कृपेने आज ‘या’ राशींची सगळी कामे सुरळीत पार पडतील!