वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, बीडमधील रुग्णालयात उपचार सुरू

Santosh Deshmukh case

Walmik Karad | बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे. सरपंच हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. 2 कोटींची खंडणी मागीतल्याप्रकरणी कराड हा सध्या अटकेत आहे. त्याची कसून चौकशी केली जातेय. या हत्या प्रकरणाचा CID आणि SIT कडून तपास सुरू आहे. कराडसोबत जयराम माणिक चाटे, महेश सखाराम केदार, प्रतिक घुले, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनावणे यांना देखील अटक झाली आहे. (Walmik Karad)

अशात वाल्मिक कराडच्या प्रकृतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे. गेल्या 9 दिवसांपासून कराड हा बीडच्या सीआयडी कोठडीत आहे. मात्र, आता तो आजारी पडला आहे. त्याच्या डोळ्याला संसर्ग झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बीडमधील जिल्हा रुग्णालयातील कराडवर उपचार सुरू आहेत.

वाल्मिक कराडला नेमकं काय झालंय?

डॉक्टरांनी त्याला डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप दिले आहेत. आज CID कडून कराडचा व्हॉईस सॅम्पल घेतला जाऊ शकतो. व्हॉईस सॅम्पल जुळल्यानंतर वाल्मिक कराड आणखी अडचणीत येऊ शकतो. देशमुख हत्या प्रकरणात कराडच मास्टरमाईंड असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून शिक्षा द्यावी, अशी मागणी सातत्याने केली जातेय.

आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक महिना पूर्ण झाला आहे. हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी,अशी मागणी सध्या केली जातेय. आज जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ अशा अनेक ग्रामीण भागातील ग्रामपंचायती बंद ठेवण्यात आल्या आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. (Walmik Karad)

धनंजय मुंडे विरोधकांकडून टार्गेट

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभर ग्रामपंचायतींनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या हत्येतील सर्व आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता जोर धरते आहे. दरम्यान, कराडमुळे अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे देखील अडचणीत आले आहेत.

वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचा माणूस असल्याने विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंडे यांना मंत्रीपदावर ठेऊ नका, अशी मागणी केली जातेय. भाजपा आमदार सुरेश धस तर या प्रकरणी रोज नव-नवीन खुलासे करत आहेत. (Walmik Karad)

News Title :  Walmik Karad not feeling well in CID custody

महत्वाच्या बातम्या –

नागपूर शहरातील पाणी पुरवठा ‘या’ दिवशी बंद राहणार

आता पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरही वेश्याव्यवसाय सुरु, आमदाराची तक्रार

पुण्यात कुत्र्यांच्या तोंडात मृतदेहाचा तुकडा?; पालिका म्हणते, ‘तो तर पावाचा तुकडा!’

राज्यातील ‘या’ भागाला अवकाळी पावसाचा इशारा!

“धनंजय मुंडे यांच्या नोकराने जमीन हडपली”; महिलेच्या नव्या आरोपांनी खळबळ

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .