Walmik Karad | बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. या प्रकरणात वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडी समोर शरणागती पत्करल्यानंतर, त्याला कोर्टात हजर करण्यात आलं आणि 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, यावेळी काय घडलं त्याबद्दल सरकारी वकिलांनी माहिती दिली आहे.
काय म्हणाले वकिल?
वाल्मिक कराडला कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर, सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्यावर जोरदार युक्तिवाद केला. माध्यमांशी बोलत असताना शिंदे म्हणाले की, वाल्मिक कराडने अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात दोन कोटींची खंडणी मागितली होती, तसंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाच्या तपासासाठी आणि अट्रोसिटीच्या गुन्ह्याबद्दल सखोल तपास करण्यासाठी ही कोठडी आवश्यक आहे.
वाल्मिक कराड (Walmik Karad) या आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने दोन कोटींची खंडणी मागितली होती. त्याबद्दलच्या चौकशीसाठी, तसंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाच्या तपासासाठी, अट्रोसिटीच्या गुन्ह्याबद्दल, तसंच त्याच्या व्हॉईस सॅम्पलसाठी त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी दिली.
कराडचे समर्थ जमले होते-
वाल्मिक कराडला (Walmik Karad) रात्री उशीरा बीडच्या केज कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाबाहेर तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळाली. केज कोर्टाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता, ज्यामध्ये तब्बल 7 पोलीस अधिकारी आणि 47 पोलीस कर्मचारी, 2 RCP प्लॅटून आणि 1 SRP प्लॅटून असा जवळपास 100 ते 125 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाल्मिक कराडचे समर्थकही तिथे जमले होते.
रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर, कोर्टाने हा मोठा निर्णय दिला. सीआयडीने 15 दिवसाची कोठडी मागितली होती आणि कोर्टाने ती मागणी मान्य केली.
News Title : Walmik Karad-police-custody
महत्त्वाच्या बातम्या-
वाल्मिक कराडच्या गुन्ह्यांची कुंडली आली समोर! 25 वर्षात तब्बल ‘इतके’ गुन्हे दाखल
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली? ऑक्सिजन लावले… नेमकं काय झालं
‘मी पवार साहेबांना फसवलं, आता त्यांच्यासमोर लोटांगण घालून पाया…’; ‘या’ आमदाराचं मोठं वक्तव्य
अनुराग कश्यपने बॉलिवूड इंडस्ट्रीची काढली अक्कल; घेतला सर्वात मोठा निर्णय
जेवण तर दूरच साधा चहादेखील घेतला नाही…; कराडचा तुरुंगात कसा गेला पहिला दिवस?