Walmik Karad | बीड (Beed) मस्साजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणातील (Murder Case) मुख्य आरोपी वाल्मिक कराडला बीडच्या ( विशेष न्यायालयाने आज (२२ जानेवारी) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. मकोका अंतर्गत ७ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर वाल्मिक कराडला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video Conferencing) न्यायालयात हजर करण्यात आले होते.
वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) वकिलांची मशीनसाठी मागणी
पोलीस कोठडीत (Police Custody) असताना वाल्मिक कराड (Walmik Karad) आजारी पडल्याचे वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी (Doctor) सांगितले की, त्याला सर्दी-खोकल्याचा (Cold and Cough) त्रास होत असून, त्यासाठी त्याला गोळ्या औषध (Medicines) देण्यात आले आहेत.
दरम्यान, वाल्मिक कराडच्या वकिलांनी (Lawyer) तो आजारी असल्याने त्याला कारागृहात (Jail) CPAP मशीन (Continuous Positive Airway Pressure Machine) देण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. झोपताना श्वासोच्छवासातील व्यत्यय दूर करण्यासाठी CPAP मशीनचा वापर केला जातो. भारतात या मशीनची किंमत साधारणपणे ३५ ते ६० हजार रुपये आहे.
डॉक्टरांचे (Doctor) म्हणणे काय?
न्यायालयात हजर करण्यापूर्वी वाल्मिक कराडची (Walmik Karad) वैद्यकीय तपासणी (Medical Examination) करणाऱ्या डॉ. अमोल जोगदंड (Dr. Amol Jogdand) यांनी सांगितले की, “वाल्मिक कराडला सर्दी-खोकला आणि तापाचा (Fever) त्रास आहे. त्याला आवश्यक औषधोपचार (Treatment) देण्यात आले आहेत. त्याची प्रकृती सध्या चांगली आहे.” वाल्मिक कराडचे (Valmik Karad) पल्स (Pulse), ब्लड प्रेशर (Blood Pressure), टेंपरेचर (Temperature) तपासण्यात आले असून, सर्दी, खोकला आणि तापासाठी त्याला गोळ्या देण्यात आल्या आहेत, असेही डॉ. जोगदंड यांनी स्पष्ट केले.
वाल्मिक कराडच्या वकिलांचा (Lawyer) दावा
यापूर्वीही वाल्मिक कराडच्या वकिलांनी (Lawyer) न्यायालयात याचिका दाखल करून, वाल्मिक कराडला कोठडीत २४ तास मदतनीस (Helper) देण्याची मागणी केली होती. वाल्मिक कराडला स्लीप अॅप्नियाचा (Sleep Apnea) आजार असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता.
आता पुढे काय?
न्यायालयाने वाल्मिक कराडला (Walmik Karad ) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. त्याच्या वकिलांनी (Lawyer) केलेल्या CPAP मशीनच्या (CPAP Machine) मागणीवर न्यायालय काय निर्णय देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Title : Walmik Karad Sent to 14-Day Judicial Custody Demands CPAP Machine in Jail Citing Health Issues