Walmik Karad Son | बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात विरोधी पक्षाकडून सत्ताधारी महायुतीला सतत टार्गेट केलं जातंय. या प्रकरणामुळे अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे देखील अडचणीत सापडले आहेत. 2 कोटींची खंडणी प्रकरणी तुरुंगात असलेला आणि हत्या प्रकरणात मास्टरमाईंड असल्याचा आरोप करण्यात आलेला वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा माणूस आहे. (Walmik Karad Son)
यामुळे धनंजय मुंडे यांना देखील घेरलं जातंय. भाजपा आमदार सुरेश धस तर याबाबत रोज धक्कादायक खुलासे करत आहेत. वाल्मिक कराड हा सध्या पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी केली जातेय. तर, दुसरीकडे वाल्मिक कराडचा मुलगा देखील आता चर्चेत आलाय. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडने मॅनेजरला धमकावून मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सुशील कराडविरोधात तक्रार दाखल
याप्रकरणी सुशील कराडविरोधात सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे.सुशील कराडने त्याच्या मॅनेजरकडून जबरदस्ती बल्कर ट्रक, कार, प्लॉट आणि सोने ताब्यात घेतल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी मॅनेजरच्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे. इतकंच नाही तर, मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवून सुशील कराडने लूट केल्याचा देखील आरोप आहे.
या प्रकरणी आता येत्या 13 जानेवारीरोजी सुनावणी होणार आहे. वाल्मिक कराडबाबत रोज धक्कादायक खुलासे होत असताना आता त्याचा मुलगा देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. कराडच्या मुलावर देखील खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. आता मॅनजरच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Walmik Karad Son)
नेमकं प्रकरण काय?
सुशील वाल्मिक कराड आणि त्याचे दोन साथीदार अनिल मुंडे आणि गोपीन गुंजेवार या तिघांविरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेचा पती सुशील कराड याच्याकडे काम करत होता.सुशील कराड हा त्याला कायम म्हणायचा की तू इतके पैसे कसे कमावले, तुझ्याकडे इतक्या गाड्या कशा आल्या, अशी सतत विचारणा करत मारहाण करत होता. इतकंच नाही तर, तिघांनी मॅनेजरचे राहतं घर आणि जागा अनिल मुंडे याच्या नावावर करुन घेतली. (Walmik Karad Son)
तसेच पीडित महिलेच्या पतीचे अडीच तोळे सोने परळीतील ज्वेलर्सला विकून त्याच्याकडून पैसे लुटले. यानंतर त्या पीडित महिलेने वाल्मिक कराडची देखील भेट घेतली होती. सततची मारहाण आणि रिव्हॉलव्हरच्या धाकाला कंटाळून पीडित महिला व तीचे कुटुंब सोलापुरात आले. याचदररम्यान सुशील कराडने परळीत पीडित महिलेच्या मुलीला मारहाण केली. आता त्या पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर या ठिकाणी तक्रार दाखल केली आहे. यावर आता 13 जानेवारीरोजी सुनावणी होणार आहे.
News Title : Walmik Karad Son sushil karad against complaint Filed
महत्वाच्या बातम्या –
प्रवाशांसाठी गुड न्यूज! लालपरीचं LIVE लोकेशन आता कळणार थेट मोबाईलवर
सरपंच हत्येपूर्वी वाल्मिक कराडने घुलेसोबत…; आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर
धक्कादायक!पिस्तूल साफ करताना स्वतःवरच झाडली गोळी, आमदाराचा जागीच मृत्यू
आज वर्षाच्या पहिल्या प्रदोषव्रताला राशीनुसार करा ‘हे’ उपाय; शनिदोष होईल दूर
आज शनिप्रदोष, ‘या’ राशींवर होणार थेट परिणाम; सतर्क राहावे अन्यथा…