‘स्टेप बाय स्टेप सर्व प्रकरणं…’; वाल्मिक कराडच्या पत्नीचा सुरेश धस, बजरंग सोनवणेंना इशारा

Walmik Karad Wife manjili karad on suresh dhas 

Walmik Karad Wife | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडला काल (15 जानेवारी) बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी न्यायालयाने कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर (Walmik Karad Wife ) मकोका लावण्यात आला आहे.अशातच त्याच्यावर सरपंच हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका देखील ठेवण्यात आलाय. यानंतर वाल्मिक कराडच्या पत्नीने पत्रकार परिषद घेऊन अत्यंत धक्कादायक आरोप केले.

मंजिली कराड यांनी भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा उल्लेख करत त्यांची प्रकरणं समोर आणणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यांनी माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा बनवलं, असा आरोप केलाय. मी माझा न्याय मागायचा कुणाकडे?, असा सवाल करत मंजिली कराड यांनी भावनिक साद देखील घातली.

काय म्हणाल्या मंजिली कराड?

“तुम्ही मीडिया ट्रायल करुन स्टेप बाय स्टेप गोष्टी काढून माझ्या नवऱ्याला अडकवलं. मी सुद्धा ज्यांनी ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या एक-एक गोष्टी बाहेर काढल्या त्यांचेसुद्धा एक-एक प्रकरण स्टेप बाय स्टेप सांगत जाईन. त्यांचे काय-काय प्रकरण आहेत ते सुद्धा मी स्टेप बाय स्टेप मीडिया समोर बाहेर काढणार.”, असा इशाराच मंजिली कराड यांनी दिलाय.

सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, खासदार बजरंग सोनवणे, अंजली दमानिया यांच्या सुद्धा गोष्टी बाहेर काढेल. त्यांच्या गोष्टीदेखील मी समोर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच मंजिली कराड यांनी दिलाय. बरंजर सोनावणे यांनी म्हटलं होतं की परळीला दोन दोन मंत्रीपद कसे मिळालेत?, ही सोनावणे यांची पोटदुखी आहे. याच पोटदुखीमुळे त्यांनी माझ्या नवऱ्याचा वापर करुन बळीचा बकरा केलाय, असा आरोपच मंजिली कराड (Walmik Karad Wife ) यांनी केलाय.

“मी कुणाकडे न्याय मागू?”

पुढे त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा देखील उल्लेख केला. देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी जरांगे पाटील मस्साजोगला गेले. मी ही मराठा समाजाची आहे. माझ्यावरही अन्याय झाला आहे. मी कुणाकडे न्याय मागू?जरांगे पाटील यांच्याकडे मी न्याय मागते आहे, असं मंजिली कराड (Walmik Karad Wife ) म्हणाल्या.’

News Title :  Walmik Karad Wife manjili karad on suresh dhas 

महत्वाच्या बातम्या-

घरात घुसून चाकूने सपासप वार, सैफ अली खानसोबत नेमकं घडलं काय?

ब्रेकिंग! अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

‘माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा बनवलं’; वाल्मिक कराडच्या पत्नीचे गंभीर आरोप

दिवसाची सुरुवातच शुभवार्ताने होईल, आज स्वामी ‘या’ राशींना देणार आशीर्वाद!

वाल्मीक कराड बद्दल कोर्टात 7 खळबळजनक दावे, एसआयटीच्या दाव्यांनी कोर्ट सुद्धा हादरलं

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .