Walmik Karad Wife | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडला काल (15 जानेवारी) बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी न्यायालयाने कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर (Walmik Karad Wife ) मकोका लावण्यात आला आहे.अशातच त्याच्यावर सरपंच हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका देखील ठेवण्यात आलाय.
बीड न्यायालयात वाल्मिक कराडला हजर केल्यावर एसआयटीचे प्रमुख अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडचा संतोष देशमुख खून प्रकरणात सहभाग असल्याचा पुरावा न्यायालयाला सादर केला. ज्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच दिवशी दुपारी 3.20 ते 3.30 दरम्यान आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांचे वाल्मिक कराड याच्याशी फोनवरून बोलणे झाले होते. या एका कॉलमुळे कराड अडचणीत सापडला.
कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी
यासंबंधीत सर्व कॉल रेकॉर्डिंग एसआयटीचे प्रमुख अनिल गुजर यांनी कोर्टात दिले, त्यानंतर पुढील तपासासाठी वाल्मिक कराडला बीड कोर्टाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यानंतर वाल्मिक कराडच्या (Walmik Karad Wife ) पत्नीची प्रतिक्रिया समोर आली आहे. मंजिली कराड यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत धक्कादायक आरोप केले. तसेच त्यांनी भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा उल्लेख करत त्यांची प्रकरणं समोर आणणार असल्याचा इशारा दिला.
“हे जे काही कट कारस्थान रचलं जातंय, जे डावपेच रचून माझ्या पतीला अडकवलं जातंय, ते प्रयत्न करुन तुम्ही माझ्या नवऱ्याला वेठीस धरुन डांबून टाकलं आहे. मग मी माझा न्याय मागायचा कुणाकडे? मी सुद्धा मराठा म्हणून माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना आणि वंजारी समाजाच्या दुसऱ्या बांधवाना आवाहन करते की, मला सुद्धा न्याय पाहिजे. मी माझा न्याय मनोज जरांगे यांच्याकडेच मागते. तुम्ही जसा मराठा समाज म्हणून तिथे जावून न्याय मागता. मी सुद्धा मराठा आहे.”, असं मंजिली कराड म्हणाल्या.
“त्यांच्या गोष्टीही बाहेर काढणार”
पुढे त्यांनी कराडवर (Walmik Karad Wife ) आरोप करणाऱ्या लोकप्रतिनिधींना देखील गंभीर इशारा दिला. “तुम्ही मीडिया ट्रायल करुन स्टेप बाय स्टेप गोष्टी काढून माझ्या नवऱ्याला अडकवलं. मी सुद्धा ज्यांनी ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या एक-एक गोष्टी बाहेर काढल्या त्यांचेसुद्धा एक-एक प्रकरण स्टेप बाय स्टेप सांगत जाईन. त्यांचे काय-काय प्रकरण आहेत ते सुद्धा मी स्टेप बाय स्टेप मीडिया समोर बाहेर काढणार.”, असा इशाराच मंजिली कराड यांनी दिलाय.
सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, खासदार बजरंग सोनवणे, अंजली दमानिया यांच्या सुद्धा गोष्टी बाहेर काढेल. त्यांच्या गोष्टीदेखील मी समोर आणल्याशिवाय राहणार नाही, असंही पुढे मंजिली कराड म्हणाल्या.त्यांनी एकप्रकारे हा इशाराच दिलाय.
News Title : Walmik Karad Wife manjili karad serious allegations
महत्वाच्या बातम्या-
दिवसाची सुरुवातच शुभवार्ताने होईल, आज स्वामी ‘या’ राशींना देणार आशीर्वाद!
वाल्मीक कराड बद्दल कोर्टात 7 खळबळजनक दावे, एसआयटीच्या दाव्यांनी कोर्ट सुद्धा हादरलं
…तो एक पुरावा अन् वाल्मिक कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी!
वाल्मिक कराड हत्येच्या दिवशी आरोपींसोबत 10 मिनिटे बोलला! सगळं सत्य आलं समोर
वाल्मिक कराड मुंडेंकडे घरगडी म्हणून होता, मग एवढी संपत्ती कशी आली?