बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ह्या तारखेपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा; वंचितचा अल्टिमेटम

औरंगाबाद | येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत 20 जुलैपर्यंत आघाडीचा निर्णय घ्या, अन्यथा वंचित बहुजन आघाडी उमेदवार जाहीर करेल, असा अल्टिमेटम रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे.

रिपब्लिकन सेनेची राज्यव्यापी बैठक मौलाना आझाद संशोधनात पार पडली. त्यानंतर आनंदराज आंबेजकारांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन सेना वंचित बहुजन आघाडीसोबतच होती. आता आगामी विघानसभा निवडणुकीतही सोबतच असेल, असं आनंदराज यांनी सांगितलं.

दरम्यान, स्वत: निवडणूक लढणार नसलो तरीही रिपब्लिकन सेनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील, असंही आनंदराज आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राहुल गांधी- महाराष्ट्र काँग्रेस बैठक संपली; विधानसभेसाठी ‘या’ पक्षाला सोबत घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय

-विनोद पाटील यांना शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी???

-…म्हणून ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता हॉटेलमध्ये भांडी घासतोय! ‘संघर्षाला सलाम…’

-“मुलं होण्यासाठी लग्न करण्याची गरज नाही; मी लग्नाच्या आधी आई होण्यास तयार”

-लोकसभेत पूनम महाजनांचा पंडित नेहरूंवर हल्लाबोल; म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More