Vinod Kambli l क्रिकेटची पंढरी (Mecca of Cricket) समजल्या जाणाऱ्या मुंबईतील (Mumbai) ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमने (Wankhede Stadium) आपल्या स्थापनेची ५० वर्षे पूर्ण केली. या सुवर्ण महोत्सवानिमित्त मुंबई क्रिकेट संघटनेने (Mumbai Cricket Association) (एमसीए) एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मुंबईसह भारतीय संघाचे (Indian Team) नेतृत्व केलेल्या मुंबईकर (Mumbaikar) कर्णधारांचा सत्कार करण्यात आला.
सुनील गावसकर (Sunil Gavaskar), दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar), रवी शास्त्री (Ravi Shastri), डायना एडुल्जी (Diana Edulji), सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दिग्गज मुंबईकर (Mumbaikar) कर्णधारांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
क्रिकेटपटूंची मांदियाळी :
या कार्यक्रमाला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पासून ते श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पर्यंत अनेक प्रसिद्ध खेळाडूंनी हजेरी लावली. या कार्यक्रमात माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) देखील उपस्थित होता. आजारपणामुळे त्याला चालण्यास त्रास होत होता, पण त्याची पत्नी अँड्रिया हेविट (Andrea Hewitt) त्याचा हात धरून त्याला आधार देताना दिसली. या हृदयस्पर्शी क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत आहे.
Vinod Kambli l विनोद कांबळीच्या संघर्षात पत्नीची (Wife) साथ :
भारतासाठी कसोटी (Test) आणि एकदिवसीय (ODI) सामने खेळलेला विनोद कांबळी (Vinod Kambli) बऱ्याच काळापासून आजारांनी ग्रस्त आहे. काही दिवसांपूर्वी त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता तो पूर्वीपेक्षा बरा असला तरी त्याला नीट बोलण्यास आणि चालण्यास त्रास होत आहे.
अलीकडेच, मुंबई क्रिकेट संघटनेने (Mumbai Cricket Association) भारत आणि मुंबईसाठी (Mumbai) खेळलेल्या मुंबईच्या क्रिकेटपटूंसाठी एका सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. वानखेडे (Wankhede) येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विनोद कांबळी त्याची पत्नी अँड्रिया हेविटचा (Andrea Hewitt) हात धरून वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) प्रवेश करताना दिसला. पुन्हा एकदा वाईट काळात कांबळीची पत्नी त्याची सर्वात मोठी ताकद बनून उभी राहिली.
कांबळीचे (Kambli) क्रिकेटमधील योगदान :
५३ वर्षीय विनोद कांबळीला (Vinod Kambli) हृदयविकाराचा झटका (Heart Attack), लघवीची समस्या (Urinary Problem) यासारख्या गंभीर आजारांनी ग्रासले आहे. त्याने भारतासाठी १७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय असे दोन्ही फॉरमॅटमध्ये (Format) एकूण १२१ सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यात २ शतकांसह २४७७ धावा केल्या आहेत. विनोदने कसोटी सामन्यात ४ शतकांसह १०८४ धावा केल्या होत्या.
रविवार को मुंबई क्रिकेट एसोसिएशन ने वानखेडे़ स्टेडियम के 50 वर्ष पूरे होने पर एक ग्रांड सेलीब्रेशन का आयोजन किया
पत्नी के साथ आए Vinod Kambli,
हाथ पकड़कर सहायता करती नजर आईं एंड्रिया,कांबली पिछले कुछ समय से कई बीमारियों से पीड़ित हैं और उन्हें अस्पताल में भर्ती होना पड़ा था,… pic.twitter.com/BhrIcxDVcJ
— Vikash Kashyap (@VikashK41710193) January 21, 2025
News Title : Wankhede Stadium’s Golden Jubilee Celebration