बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून मुंबई इंडियन्सचे समर्थक म्हणतात, पहिली मॅच आम्हाला हरायचीय!

मुंबई | 2021 आयपीएलला चेन्नईमध्ये सुरुवात झाली आहे आणि पहिलाच सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये जोरदार काट्याचा पहायला मिळतोय. या सामन्याचा निकाल (बातमी लिहीत असताना) अद्याप बाकी आहे, मात्र त्याआधीच मुंबई इंडियन्स संघाच्या समर्थकांच्या एका मागणीची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा सुरु आहे.

मुंबई इंडियन्स आयपीएलच्या पहिल्या सामन्यात हरली तरच ती संपूर्ण आयपीएलमध्ये चांगली खेळते, एवढंच नव्हे तर विजेतेपद देखील मिळवते, असा समज मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये आहे. याआधी झालेल्या काही घटना यासाठी कारणीभूत आहे त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये हा समज रुढ झाला आहे.

आता कोहलीच्या टीमविरोधात मुंबईची अटीतटीची लढाई सुरु आहे, मात्र चक्क मुंबईचे काही समर्थक आपल्या टीमला समर्थन देण्याऐवजी संघाच्या पराभवाची कामना करत आहेत. यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ भविष्यात चांगली कामगिरी करेल, अशी त्यांची भावना आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्सचे पाठीराखे सोशल मीडियावर मोठ्या संख्येनं आहेत. ते आपल्या संघाचे अत्यंत कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. चेन्नई वगळता अन्य कुठल्या संघाकडे क्वचितच असे चाहते असतील. त्यामुळे आता पहिल्या सामन्याचा निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अजित पवारांचं बोलणं टग्यासारखं अन् रडणं बाईसारखं- गोपिचंद पडळकर

एवढी कुठं ताकद असते का राव?, ‘या’ खेळाडूनं शॉट मारताच बॅटचे दोन तुकडे, पाहा व्हिडीओ

वीकेंड लाॅकडाऊनच्या पुर्वसंध्येला महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आकडेवारी धक्कादायक

रुग्णाचा एकटेपणा घालवण्यासाठी नर्सची भन्नाट आयडिया, वाचा सविस्तर

पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More