बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

झटपट वजन कमी करायचंय? मग ‘हे’ 4 चमचमीत पदार्थ करू खा… होतील फायदेच फायदे

मुंबई | वजन कमी करण्यासाठी लोक अनेक खर्चिक उपाय करतात. भरपूर पैसा ओतून तास-न्-तास जीम मध्ये वेळ घालवतात. महागड्या शस्त्रक्रिया करून किंवा आहार तज्ज्ञाला पैसे देऊन डाएट प्लॅन घेतात पण या खिशाला न परवडणाऱ्या उपायांमुळे अनेकदा शरीराला अपायही पोहोचतो. खर्चिक उपाय न करता अगदी घरचं चमचमीत खाऊनही तुम्ही वेट लॉस (Weight Loss Tips) करू शकता.

चमचमीत पदार्थ खाऊन वजन कमी करता येत नाही हा आपल्याकडे खूप मोठा गैरसमज आहे. घरी बनवलेल्या काही चमचमीत पदार्थांचा आहारात समावेश करूनही तुम्ही झपाट्याने वजन कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी पापड हा उत्तम पदार्थ आहे. पापडात मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोटिन्स असतात जे आरोग्यासाठीही चांगले असतात.

जेवणापूर्वी आपण पापड खातो पण दिवसात कधीही भूक लागली तर पापड हा चांगला पर्याय आहे. फक्त पापड तळण्याऐवजी भाजून खायचा कारण तळलेल्या पापडाने वजन वाढण्याची शक्यता असते. चमचमीत ढोकळा (Dhokla) सगळ्यांनाच आवडतो. कमी कॅलरीज असणारा हा ढोकळा मायक्रोव्हेव मध्येही अगदी झटपट तयार होतो आणि विशेष म्हणजे ढोकळा वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे.

वेळी अवेळी लागणाऱ्या भूकेसाठी ओट्स आणि गाजरयुक्त ईडली आरोग्यसाठी तर उत्तम आहेच शिवाय वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. एकदा खाल्ली की लवकर भूक लागत नाही आणि दिवसभर कोणत्याही वेळी आपण ती खाऊ शकतो. चुरमुरे आणि हरभऱ्यांचा आहारात समावेश केला तर पोटाचा त्रास वजन वाढण्याचा धोका दोन्ही कमी होतात. या काही पदार्थांचा (Weight Loss Food) तुमच्या आहारात समावेश केला तर तुम्हालाही फरक जाणवेल.

थोडक्यात बातम्या-

बिग बॉसच्या घरात कोरोनाची वाईल्ड कार्ड एन्ट्री; ‘या’ सदस्याला कोरोनाची लागण

गृहिणींचं बजेट मोडलं! ‘या’ भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ

इंधन दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; वाचा आजचे ताजे दर

RBIनं ‘या’ बॅंकेवर घातली बंदी, खात्यातून फक्त 10 हजार काढण्याची मुभा

काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यासह तब्बल 12 आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More