बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

WANTED! किरण गोसावीच्या अडचणी वाढल्या, पुणे पोलिसांनी उचललं ‘हे’ पाऊल

पुणे | सोमवारी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील किरण गोसावीची एक ऑडीयो क्लिप व्हायरल झाली आहे. व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपमध्ये किरणने लखनऊ पोलिसांकडे सरेंडर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता पुणे पोलिसांचं पथक या ऑडियो क्लिपनंतर किरणला अटक करण्यासाठी लखनऊला रवाना झालं आहे.

व्हायरल झालेल्या ऑडीयो क्लिपमध्ये किरणने आपण लखनऊमध्ये असल्याचं सांगत सरेंडर करण्याची मागणी केली होती. मात्र लखनऊ पोलिसांनी त्याला अटक करुन घेण्यास नकार दिला. तसेच दुसऱ्या ठिकाणी सरेंडर होण्याचा देखील सल्ला दिला. मात्र ही ऑडीयो क्लिप व्हायरल झाल्यानंतर अर्थातच किरणचं ठिकाण समजल्यानंतर त्याची अटक निश्चित असून त्याला अटक करण्यासाठी पुणे पोलीसांचं पथक रवाना झालं आहे.

आर्यन खानला सोडवण्याकरिता किरण गोसावीने 25 कोटी रूपयांची मागणी केली आहे, असा दावा प्रभाकर साईलने केला आहे. प्रभाकर साईलच्या दाव्यानुसार 25 कोटींचं डिलही समीर वानखेडे यांच्यावतीनं करण्यात आली आहे. प्रभाकर साईल किरण गोसावीचा बॉडीगार्ड आणि आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचा साक्षीदार आहे.

दरम्यान, आर्यन खानला रेव्ह पार्टीतून हाताला पकडून नेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये किरण गोसावी आर्यनसोबत दिसले. यावेळी किरण गोसावी एनसीबीच्या कोणत्याही पदावर नसताना तिथं काय करत होते?, असा सवाल समोर येताच किरण गोसावी फरार झाला. 2 ऑक्टोबर रोजी किरण फरार झाला असून 24 दिवसांपासून त्याचा शोध सुरु होता. मात्र आता किरणच्या अटकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

“लसीकरण होऊनही तुमच्या निष्काळजीपणामुळे कोरोना पसरतोय”

टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार आली बाजारात, ‘हे’ आहेत भन्नाट फिचर्स

….म्हणून शिक्षक उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहिलं पत्र

मुंबईकरांसाठी खुशखबर! लोकल प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

‘ज्या शिवसेनेने केलाय घात, त्यांचा..’ भाजप उमेदवाराच्या प्रचारात आठवलेंची खास शैलित शेरेबाजी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More