बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वारकऱ्यांनो आळंदीच्या वारीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा- बंडातात्या कराडकर

सोलापूर | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाच्या वर्षीही आषाढी वारीवर निर्बंध लाधले आहेत. सरकारच्या या निर्णयाला जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी वारकऱ्यांना वारीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

सरकारने आधी वारकरी प्रतिनिधींशी चर्चेचे नाटक केलं आणि आपला निर्णय कायम ठेवला. या वारीला किमान 100 मानकरी वारकऱ्यांसह संतांच्या पादुका जाव्यात अशी मानकऱ्यांची भावना होती. पण सरकारने एकतर्फी निर्णय लादला. त्यामुळे संप्रदाय प्रमुखांशी चर्चा करून पायी जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं बंडातात्या कराडकर यांनी म्हटलं आहे.

‘वाघ म्हटलं तरी खातो अन वाघ्या म्हटलं तरीही खातोच’ म्हणूनच शासनाला अंगावर घेतलं, पाहिजे असं आवाहन वारकर्‍यांना कराडकरांनी केलं आहे. येत्या 3 जुलै रोजी बंडातात्या कराडकर यांनी वारकऱ्यांना आळंदीमध्ये उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, वारकरी संप्रदायाला आवाहन केल्याबद्दल कराडकर यांना समज देण्यासाठी पोलीस गेले आहेत, असं पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल यांनी सांगितलं. मात्र फलटण पोलीस पिंप्रदच्या गुरुकुल आश्रमात गेले मात्र तिथे बंडातात्या कराडकर नसल्याची माहिती समजत आहे.

थोडक्यात बातम्या- 

…म्हणून ट्विटरवर चाईल्ड पॉर्नोग्राफीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

औरंगाबादमधील ‘या’ आमदाराने भर चौकात केली बेशिस्त रिक्षाचालकाला मारहाण; पाहा व्हिडीओ

‘लस घ्यायला आली की फोटोशुटसाठी?’; लसीकरणासाठी आलेली मलायका झाली ट्रोल, पाहा व्हिडीओ

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More