आरोग्य कोरोना पुणे महाराष्ट्र

धक्कादायक! पुण्यात वॉर्डबॉयकडून कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग

पुणे | राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. पुण्यातही रूग्णसंख्या वाढताना दिसतेय. तर दुसरीकडे उपचारांसाठी रुग्णालयात किंवा कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या महिलांच्या विनयभंगच्या घटनाही समोर येतायत.

नुकतंच हडपसरमध्ये सह्याद्री रुग्णालयातील कोरोनाबाधित महिलेचा वॉर्डबॉयकडून विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा रुग्णालयातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित करण्यात येतोय. यापूर्वी पुण्यात सिंहगड रोडवरील कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, अशोक नामदेव गवळी या वॉर्डबॉयला अटक करण्यात आलीये. हडपसर भागातील सह्याद्री रूग्णालयात तो सेवेत असून याच रुग्णालयात एक 35 वर्षीय महिला कोरोनावर उपचार घेतेय. ही महिला एका खोलीमध्ये काल सायंकाळच्या सुमारास आराम करत असताना रुग्णालयातील वॉर्डबॉय अशोक गवळी त्या महिलेच्या खोलीत जाऊन, तिच्या चेहर्‍यावरील मास्क काढून तुम्ही मला ओळखता का? असं विचारलं.

या दरम्यान रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याने हा प्रकार पाहिला आणि वॉर्डबॉयला हटकलं. त्यामुळे आरोपी तेथून पळून गेला आणि त्या खोलीतील घडलेला सर्व प्रकार प्रत्यक्षदर्शी महिलेने रुग्णालय प्रशासनाला तातडीने कळवला. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय.

महत्वाच्या बातम्या-

विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी…., राज्यपालांची महत्त्वाची सूचना

“आमच्या नेत्यांमध्ये दोन काय, चार बायका सांभाळण्याची ताकद”

अण्णाभाऊ साठे यांचं मुंबईत स्मारक उभारणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

राजू शेट्टी सरकारी आंदोलक, त्यांची लुटूपुटूची लढाई सरकार वाचवण्यासाठी- देवेंद्र फडणवीस

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं प्रदीर्घ आजारानं निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या