Top News

मुंबई ते वर्धा पायपीट करत गावी परतलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह

Loading...

वर्धा | मुंबई ते वर्धा अशी पायपीय करुन रोहणा येथे दाखल झालेल्या 25 वर्षीय तरुणाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. हा तरुण 20 मे रोजी सकाळी वर्ध्याच्या रोहणा येथे पोहोचला. रोहणा येथे पोहोचताच त्याने थेट प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं.

संबंधित तरुणामध्ये कोरोनाची लक्षण आढळत असल्याने त्याला तातडीने रुग्णवाहिकेने आर्वी येथील आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याची 21 मे रोजी कोरोना चाचणी केली गेली. या चाचणीचा अहवाल आज समोर आलाय. या अहवालात तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

हा तरुण मुंबईच्या अंधेरी येथे वास्तव्यास होता. तिथे तो एका क्लिनिंग सेंटरवर हाऊस किपिंगचं काम करायचा. मात्र, लॉकडाऊनदरम्यान काम बंद पडल्याने त्याने मुळगावी परतण्याचा निर्णय घेतला. हा तरुण पायपीट करुन 20 मे रोजी वर्ध्यात दाखल झाला.

हा तरुण मुंबईहून पायी निघाला होता. वाटेत त्याने अनेक वाहनांद्वारे टप्प्याटप्प्याने प्रवास केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे तो किती लोकांच्या संपर्कात आला, याचा तपास प्रशासनाकडून घेतला जात आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

हा शिवसेना नेता राज्यपालांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

धोक्याची घंटा…. गेल्या 48 तासांत 288 पोलिसांना कोरोनाची बाधा

महत्वाच्या बातम्या-

“आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील”

…तर तुमचं नेटफ्लिक्सचं अकाऊंट बंद होऊ शकतं

निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही- रोहित पवार

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या