वारी ‘ती’ची, #FacebookDindiLive चा स्तुत्य उपक्रम

पुणे | वारीच्या माध्यमातून दरवर्षी सामाजिक बांधिलकी राबवणाऱ्या #FacebookLiveDindi च्या टीमने यंदाही स्तुत्य उपक्रम राबवला आहे. वारी ‘ती’ची असं या उपक्रमाचं नाव आहे. 

स्त्री जीवनाची संघर्षमय “वारी” मांडण्याचा आणि त्यावर संवाद घडवून सामाजिक परिवर्तन घडवण्याचा या उपक्रमामागचा मानस आहे.

#FacebookDindiLive हा तरुण-तरुणींचा असा ग्रुप आहे, जो वारीचे प्रत्येक अपडेट फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर देत असतो. गेल्या वर्षी सुद्धा या टीमने पाणी वाचवा हा उपक्रम राबवला होता. 

Photo- #FacebookDindiLive