राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण

नागपूर |राज ठाकरे हे विझलेला दिवा आहेत, अशी टीका एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केली आहे. ते वंचित बहुजन आघाडीच्या नागपूर येथील सभेत बोलत होते.

70 वर्षात राजकीय पक्षांनी दलित आणि मुस्लिमांचा वापर फक्त मतासाठी केला, असा आरोप वारिस पठाण यांनी केला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीनं 15 वर्षात सत्तेवर असताना मुस्लीम आरक्षणासाठी  काहीच केलं नाही, असं वारिस पठाण यांनी म्हटलं आहे. फडणवीस सरकार न्यायालयाचा निर्णयही मानत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुनही वारिस पठाण यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

-RAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया

-भारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी

-जिजाऊंचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘पत्नी’; शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार

-राफेल कराराबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

-निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी-राहुल गांधी आले समोरासमोर आणि….