Top News देश

चोराच्या उलट्या बोंबा! आता वारिस पठाण म्हणतात, ‘मी तसं बोललोच नाही’

Loading...

नवी दिल्ली |  आम्ही 15 कोटी असलो तरी 100 कोटींवर भारी आहोत, असं म्हणत एमआयएमचे नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी धमकी वजा इशारा दिला होता. मात्र, आता त्यांनी कोलांटउडी घेतल्याचं दिसत आहे. कारण, मी तसं बोललोच नाही, असं म्हणत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

वारिस पठाणांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. देशभरातून या वक्तव्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसीही वारिस पठाणांवर नाराज होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर ते बॅकफूटवर आल्याचं दिसत आहे.

मी तसं काही बोललोच नाही. माध्यमवाल्यांनीच माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं वारिस पठाण म्हणाले आहेत. मी माफी मागणार नाही, असं सुरुवातीला म्हणणारे पठाण पक्षाने सज्जड दम भरल्यानंतर नमल्याचं दिसत आहेत.

मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे आणि या देशातील विविधतेचा मी कायमच आदर केला आहे, असंही वारिस पठाण म्हणाले आहेत.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

एमआयएम हा मुसलमानांचा पक्ष नाही तर तो रझाकारांचा पक्ष- विश्वंभर चौधरी

मिसळसोबत ब्रेड नको पाव द्या; पुणेकर तरुणाचं आंदोलन व्हायरल

महत्वाच्या बातम्या-

शरद पवारांना ‘भारतरत्न’, तर गोपीनाथ मुंडेंना ‘पद्मभूषण’ देण्याची मागणी

तिचे पाय तोडलेत तरी चालेल; ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणाऱ्या तरुणीच्या वडिलांचा संताप

दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी राज ठाकरेंनी घेतली होती शरद पवारांची मुलाखत

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या