बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर ‘ते’ वक्तव्य मागे घेतो- वारिस पठाण

मुंबई | आम्ही 15 कोटी 100 कोटींना भारी आहोत, असं बेताल वक्तव्य एमआयएम नेते आणि भायखळ्याचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वारिस पठाण यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.

आम्ही 15 कोटी शंभरांवर भारी आहोत, असं मी म्हणालो होतो. या शंभरांमध्ये आरएसएस, भाजप आणि बजरंग दलवाले येतात. मी 100 कोटी म्हणालो नाही, त्यामुळे माझं वक्तव्य हिंदूंविरोधी होतं असं म्हणणं चुकीचं आहे, असं वारिस पठाण म्हणाले आहेत.

मी देशविरोधी असल्याचं भासवलं जात आहे, तसेच हिंदू विरोधी असल्याचं म्हटलं जात आहे. पण मी सच्चा मुसलमान आहे. त्यामुळे स्वत:च्या देशाबद्दल आणि येथे राहणाऱ्या लोकांचा मी आदर करतो. तसेच सर्व धर्मांचा मी आदर करतो, असं ते म्हणाले आहेत. मला आणि एमआयएमची बदनामी केली जात असल्याचंही वारिस म्हणाले आहेत.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. असे असले तरी माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो. मी भारतीय असून भारतीय असल्याचा मला अभिमान आहे, असंही ते म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

उद्धव ठाकरे-मोदी भेटीनंतर ‘वर्षा’वर तातडीची बैठक… शरद पवार, उद्धव ठाकरे अजित पवार हजर

“एमआयएम आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू”

महत्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडी म्हणजे दगडापेक्षा विट मऊ- राजू शेट्टी

नीरेचं पाणी पेटलं… बारामतीला पाणी वळवल्याच्या निषेधार्थ फलटण बंद

…म्हणून मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही- उदयनराजे भोसले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More