Top News क्राईम देश पुणे महाराष्ट्र

गजानन मारणेला आणखी मोठा धक्का, पोलिसांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

पुणे | तळोजा कारागृहातून निर्दोषपणे मुक्त झालेल्या गुंड गजानन मारणेवर एका मागे एक गुन्हे दाखल होत आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गजानन मारणे व त्याच्या टोळीने जंगी मिरवणूक काढली होती. दहशत निर्माण करण्याच्या इराद्याने ही मिरवणूक काढल्याचा आरोप करत त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती.

हिंजवडी पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गजानन मारणे विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पाठोपाठ मारणेवर वारजे पोलिस ठाण्यात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

15 फेब्रुवारीच्या रात्री सुमारे साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान पुणे-बंगळूर महामार्गावरील चांदणी चौकात वारजे पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना मारणे त्याच्या साथीदाऱ्यांसोबत जात होता. याचदरम्यान वारजे पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवून कोवीड-19 अनुषंगाने परवानगी घेतली का? या बाबतीत विचारपूस करताना गुन्हेगार संतोष शेलारने गाडीतून हात काढून त्यांना बाजूला धक्का दिला. आपली दहशत निर्माण करण्यासाठी रेकाॅर्ड वरील गुन्हेगार गजानन मारणे व त्याचे साथीदार पुणे-बेंगलुरू महामार्गावरील चांदणी चौक येथून कोथरुडच्या दिशेने न थांबताच निघून गेले.

कोविड 19 सारख्या भयंकर जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव होत असताना तोंडाला मास्क न लावता आजाराचा प्रसार करण्यास हातभार लावला असून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे गजानन मारणे सोबत 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दहशत निर्माण करण्यासाठी कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नसून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असं पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घडतंय असं, ‘या’ महिलेला दिली जाणार फाशी!

पूजाला होता ‘हा’ आजार, आई-वडिलांनी दिली महत्त्वाची माहिती

टोल प्लाझा पुन्हा राज ठाकरेंच्या निशाण्यावर?; 21 फेब्रुवारीनंतर उचलणार हे पाऊल

‘या’ तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार- अजित पवार

शिक्षणसंस्था अशी पाहिजे की सुरवंटाचेही फुलपाखरू झाले पाहिजे; गिरीश प्रभुणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या