Top News आरोग्य कोरोना महाराष्ट्र सोलापूर

वारकरी बाहेर पडले तर सरकारच्या अंगलट येईल, ‘या’ महाराजांनी दिला इशारा

Photo Courtesy- Facebook/बंडातात्या कराडकर

सोलापूर | महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या 2020 च्या शेवटी आटोक्यात आली असताना नवीन वर्षात कोरोना रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात कोरोना अधिकच वाढल्याचे दिसून आले, त्यानंतर, राज्य सरकारने अनेक ठिकाणी निर्बंध लादले आहेत. राज्य सरकारच्या नवीन निर्बंधांनुसार 23 फेब्रुवारीला पंढरपूरमध्ये निघणारी माघी यात्राही रद्द करण्यात आली आहे.

पंढरपूर शहरासह जवळपासच्या 10 गावांमध्ये एकादशीच्या दिवशी संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनामार्फत देण्यात आले आहे. या निर्णयाला वारकरी संप्रदायाने कडाडून विरोध केला आहे. ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करत प्रशासनाने वारकरी संप्रदायाचा अंत पाहू नये अन्यथा वारकऱ्यांचा उद्रेक होईल असं सांगितलं आहे.

पोलिसांनी वारकऱ्यांचा उद्रेक होईल असं कृत्य करू नये अन्यथा आम्ही रस्त्यावर आल्यास ते सरकारच्या अंगलट येईल अशा तिखट शब्दात बंडातात्यांनी आपला निषेध नोंदवला. पंढरपूरमध्ये गर्दी टाळण्यासाठी मठ, धर्मशाळा रिकाम्या करण्याचे आदेश वारकऱ्यांना पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.

एखादा वारकरी पंढरपूर मध्ये आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचं पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राजकीय पक्षांचे मेळावे, शहरातील बाजारपेठा येथे वारी पेक्षा जास्त प्रमाणात गर्दी होत असते, त्यामुळे फक्त वारीलाच विरोध का? असा संतप्त सवाल वारकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईत खासदाराची आत्महत्या, अधिकारी व बड्या मंत्र्यांची नावं लिहून ठेवल्यानं खळबळ

आतुरता संपली; नवीन टाटा सफारी लाँच, किंमतही ठरली

कोरोना नियमांचं उल्लंघन, भाजप नेत्यासह तिघांवर गुन्हा दाखल

पुण्यातील ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण, अजित पवारांच्या बैठकीला होते उपस्थित!

‘…तर मला आज नातवंडे असती’; भाईजानने व्यक्त केली खंत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या