“उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारेंना समज द्यावी”

पुणे | राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आक्रमक भूमिका घेत भाजपची चांगलीच डोकेदुखी वाढवलेली असतांना आता सुषमा अंधारे याच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

एका भाषणात संताच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप वारकरी करू लागले आहे. वारकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय.

सुषमा अंधारे यांच्या विरोधात वारकरी आक्रमक झाले असून उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना समज द्यावी अशी मागणी देखील वारकरी संप्रदायातून होऊ लागली आहे. वारकरी किर्तनकार संजीवनी हिंगोलीकर यांनी याबाबत मागणी केली आहे.

सुषमा अंधारे यांनी संतांबाबत चिड आणणारी वक्तव्ये केल्याने सर्व वारकऱ्यांमध्ये संताप आहे. सुषमा अंधारे राजकिय फायद्यासाठी संताचा अपप्रचार करणं बंद करा, अशी सर्व संतांची आणि वारकरी संप्रदायाची मागणी असून तात्काळ माफी मागा, असं वारकरी कीर्तनकार संजीवनी हिंगोलीकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-