बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मालदीवमध्ये दारु पिऊन वॅार्नर आणि स्टेलर यांच्यात जोरदार हाणामारी?, स्टेलरनं दिलं स्पष्टीकरण

मुंबई | आयपीएलचा 14 हंगाम कोरोनामुळे थांबवण्यात आला आहे. बायोबबलमध्येही कोरोनाचे शिरकाव झाला आणि खेळाडूंना लागण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. मात्र या सगळ्यात अडकून पडले ते विदेशी खेळाडू. आस्ट्रेलियाच्या खेळाडूंना याचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत आहे. कारण ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणाऱ्या विमानांना 15 मेपर्यंत बंदी घातली त्यामुळे ऑस्ट्रेलिय खेळाडूंना मालदीवला थांबावं लागलं आहे.

मालदीवमध्ये सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मायकेल स्लेटर यांच्यात हाणामारी झाल्याचं वृत्त टेलिग्राफने दिलं होतं. त्यामुळे खरंच या दोघांमध्ये हाणामारी झाली का?, असा प्रश्न सर्वांना पडला होता. अशातच यावर मायकेल स्लेटर आणि वॉर्नर या दोघांनी या हाणामारीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

वॉर्नर आणि मी खूप चांगले मित्र आहोत आणि आमच्यात भांडणाची शक्यता शून्य आहे, असं मायकेल स्लेटर यांनी म्हटलं आहे. तर काहीही झालेले नाही. आपल्याला या प्रकारच्या गोष्टी कुठून मिळतात हे माहीत नाही. आपण येथे नसल्याशिवाय आपण काहीही लिहू शकत नाही आणि आपल्याला कोणतेही ठोस पुरावे मिळणार नाहीत कारण असं काही घडलेच नसल्याचं वॉर्नर म्हणाला.

दरम्यान, डेव्हिड वॉर्नर आणि मायकेल स्लेटर यांच्यात हाणामारी झाल्याचं वृत्ता मोठ्या प्रमाणात पसरलं होतं. मात्र आता दोघांनीही यावर स्पष्टीकरण दिल्यामुळे या विषय आता बंद झाला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“मदतीची विमानेच्या विमाने येत आहेत, ती नेमकी कुठे जात आहेत याचा खुलासा केंद्राने करावा”

“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”

जगप्रसिद्ध ‘लॅन्सेट’चा कोरोनाबद्दल धक्कादायक दावा, मोदी सरकारवर जोरदार टीका

पंढरपूरच्या निवडणुकीनं घात केला, कोरोनानं एकाच कुटुंबातील चौघांचा बळी घेतला!

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत फॅमिली डॉक्टर्सवर ही मोठी जबाबदारी, सरकारचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More