बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मालदीवमध्ये कोसळलेल्या रॉकेटबाबत वॉर्नरने सांगितला थरारक अनुभव, पाहा व्हिडीओ

मुंबई | अंतराळात स्वत:चं स्पेश स्टेशन तयार करण्याच्या महत्वाकांक्षेतून चीनने पाठवलेलं एक रॉकेट कोसळलं होतं. चीनचं हे रॉकेट मालदीवजवळ समुद्रात कोसळलं. मात्र आयपीएल थांबवण्यात आल्यामुळे भारतात सध्या अडकून पडलेला ऑस्ट्रेलियाचा संघही मालदीवला थांबला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ हे रॉकेट पडताना पाहून कावराबावरा झाला होता. याबाबत आस्ट्रेलियाचा सलमीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही तो धमाका ऐकला. एक्स्पर्टच्या मते तो रॉकेट पडण्याचा आवाज नव्हता, तर वातावरणात रॉकेटमुळे जे घर्षण निर्माण झालं, त्याचा होता, असं डेव्हिड वॉर्नर म्हणाला. मालदीवला असलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आणि स्टाफ रॉकेट कोसळलं तेव्हा किनाऱ्यापासून काही अंतरावर होता.

सकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास रॉकेट मालदीवजवळ कोसळलं, तेव्हा माझा डोळा उघडला, असं डेव्हिड वॉर्नरने द ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. तर चीनचं रॉकेट पडतानाचा ट्विटरवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र या व्हिडीओ खरा आहे म्हणून सांगितलं नाही. परंतू हा व्हिडीओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला दिसत आहे.

दरम्यान, 29 एप्रिल रोजी चीनकडून हे रॉकेट अंतराळात सोडण्यात आले होते. हे रॉकेट अंतराळात स्पेस स्टेशन बांधण्यासाठी साहित्य घेऊन जात होते. मात्र, तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या रॉकेटने पृथ्वीच्या दिशेने आलं. रॉकेट पृथ्वीवर कोसळल्यास मोठे नुकसान होईल, अशी शक्यता चिनी माध्यमांनी वर्तविली होती. मात्र पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर हे रॉकेट नष्ट करण्यात आलं. त्यानंतर रॉकेटचे तुकडे मालदीव्जजवळ अरबी समुद्रात जाऊन कोसळल्याचं  रॉयटर्स या वृत्तसंस्थेनेनं सांगितलं.

 

थोडक्यात बातम्या-  

पुण्यात मोलकरणीने तब्बल 40 लाख रूपयांच्या सोन्यावर मारला डल्ला, अशा प्रकारे पोलिसांनी पकडली चोरी

नवऱ्याने आपल्या दुसऱ्या पत्नीची तलवारीने गळा चिरून केली हत्या

पोलीस पतीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी डॉक्टर पत्नी सेवेवर; ‘मला थांबणं शक्य नाही…

“सामनाचा अग्रलेख म्हणजे ‘खाली डोकं वर पाय’”

‘आदित्य ठाकरे यांचा ढोंगी चेहराही आता उघड झाला’; भाजपच्या ‘या’ आमदाराची जहरी टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More