बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील ‘या’ भागात रेड अलर्ट जारी, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

मुंबई | कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्याला रेड तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसाचा तुफान मारा गुरुवारीदेखील सुरूच राहणार आहे.

15 जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. 16 जुलै रोजी देखील कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, आता 24 तासांऐवजी 15 मिनिटांच्या अंतराने हवामान अंदाज वर्तवण्याचा विचार सुरू आहे, असं केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी सांगितलं आहे. ते एका ऑनलाइन कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रामध्ये बोलत होते.

थोडक्यात बातम्या- 

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांमध्ये 89 पदांवर भरती; असा करा अर्ज

सोन्याच्या दरात आज देखील वाढ, वाचा ताजे दर

शरद पवारांना राष्ट्रपती करायचं असेल तर….- प्रविण दरेकर

मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याला जमावाकडून बेदम मारहाण

“देवेंद्र फडणवीस म्हणजे राजकारणातील सर्वात लबाड माणूस”

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More