मुंबई | यंदाच्या उन्हाळ्यानं (Summer) तर सर्व रेकाॅर्ड ब्रेक करत उच्चांक गाठला आहे. यंदाच्या रखरखत्या उन्हाळ्यात नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
2 मे पर्यंत तीव्र उष्ण लहरींचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. विदर्भातील 10 पैकी 5 जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रदेखील तापमान 45 अंश सेल्सिअस पर्यंत गेलंय.
जवळपास अर्ध्या भारतामध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याने महाराष्ट्रातही तापमानवाढ कायम राहणार आहे. त्यामुळे गरज असल्यासच बाहेर पडायला सांगितलं जात आहे.
दरम्यान, यंदाचा उन्हाचा पारा एवढा आहे की उष्मघातानं अनेकांना आपला जीव गमवावा लगला आहे. एकीकडे कडाक्याचा उन्हाळा सुरु आहे तोच दुसरीकडे अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
थोडक्यात बातम्या –
“जोपर्यंत भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत राज ठाकरे महाराष्ट्राचं कौतूक करणार नाहीत”
“काय शोकांतिका आहे, नवाब मलिक जेलमध्ये बसून मंत्रिमंडळाचा निर्णय घेतात”
सलमान खानच्या ‘या’ चित्रपटातून शहनाज गिल लवकरच करणार बाॅलिवूड पदार्पण
“देवेंद्र फडणवीस येत्या वर्षभरात मुख्यमंत्री होतील”
हाय गर्मी ! उन्हाचा तडाखा पाहून महिलेनं चक्क गाडीवर भाजली चपाती, पाहा व्हिडीओ
Comments are closed.