राज्यातील ‘या’ भागात गारपीटीसह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई | पुढील तीन दिवस राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात अवकाळीचा फटका बसण्याचा इशारा दिला आहे.

आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कापणीला आलेल्या पिकांचा फटका बसण्याची शक्यता आहे. आज जळगावसह नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.

16 मार्चपर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 13 ते 16 मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. 

उद्या म्हणजेच 14 मार्चला नाशिकसह अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, बीड, परभणी, पुणे या जिल्ह्यांना यलो जारी करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-