बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आजही मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

मुंबई | मागील वर्षापेक्षा या वर्षी पाऊस अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानूसार राज्यामध्ये काही भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. गेले दोन-तीन दिवसांपासून काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच या संदर्भात हवामान खात्याने एक अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा अंदाज आहे.

कारण रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. ही माहिती भारतीय हवामान खात्याचे ज्येष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. त्यामुळे संबंधित पाच जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, सिंधूदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असल्याचीही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, किनारपट्टीवरच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रावरून येणाऱ्या ढगांचा प्रवास पुण्याच्या दिशेने संथ गतीने सुरु आहे. त्यामळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील काही भागात पुढील 48 तासात धोधो पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल, तरच घराबाहेर पडावे. अन्यथा विनाकारण घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

द्रविडचा एक मेसेज अन् चाहरनं सामना पालटवला, वाचा नेमकं काय सांगितलं?

“मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचं पूर्ण सामर्थ्य सत्ताधारी शिवसेनेत आहे”

पेट्रोल-डिझेलवरील करातून केंद्र सरकार मालामाल, तब्बल ‘इतकी’ कमाई

पहिल्यांदा गोळीबार… नेम चुकवून धावत सुटला तर पाठलाग करुन सपासप वार

जगाचं टेंशन वाढलं!; कोरोना गेला नाही तेच नोरो व्हायरसचा धुमाकूळ

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More