बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! मुंबईसह राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई | राज्यात मान्सूनला सुरूवात झाली आहे. सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसाने मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळत आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुुरू आहे. येत्या 3 ते 4 दिवस राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याने मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मागील तीन दिवसांपासून मुंबईला पूर्व मोसमी पावसानं झोपडून काढलं आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते तुंबल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. यावर्षी देशात 101 टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

मागील 12 तासांत मुंबईत 140 ते 160 मिली इतका पाऊस झाला. तर 24 तासांत 500 मिली पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाला सज्ज राहण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

दरम्यान, मुंबईतील पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूममध्ये आले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला.

थोडक्यात बातम्या- 

‘हे लग्न पूर्णपणे बेकायदेशीर होतं’; नुसरत जहांचे पतीवर गंभीर आरोप

रेल्वे रूळ की नदी?, पहिल्या पावसात मुंबईची झाली तुंबई, पाहा व्हिडीओ

आश्चर्यकारक! ‘या’ महिलेने एकाचवेळी दिला 10 मुलांना जन्म

खुशखबर! लॉकडाऊननंतर फक्त 72 रूपयांमध्ये ‘या’ ठिकाणी राहायची सोय

कौतुकास्पद! कोरोना काळात उपासमार होणाऱ्या 500 माकडांना पोलिस हवलदाराची मदत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More