बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

6 जानेवारीपासून ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीनं जोर धरलेला पहायला मिळाला. ऐन थंडीतही पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे नागरिकांचे भरपूर नुकसान झालं. थंडीची लाट सुरु असतानाही अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे. अशातच काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पु्न्हा एकदा पाऊस (Rain) कोसळणार असल्याचं हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलं आहे.

येत्या सहा जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. हा जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्र, नाशिक, खान्देश तसेच विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे. या भागात काही तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचाही दोर वाढण्याची शक्यता आहे.

अजूनही कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे काही ठिकाणी गारपीटदेखील होण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सांगितलं जात आहे.

दरम्यान, वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदलल्याचं चित्र पहायला मिळत आहे. यामुळे अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. वातवरणातील बदलांमुळे कधी काय होईल याचा नेम नाही.

थोडक्यात बातम्या – 

“वेळ आली तर…”; राजेश टोपेंचा महाराष्ट्राला मोठा इशारा

नाईट कर्फ्यूबाबत वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले…

आरोग्य सचिवांचं कोरोनाबाबत धक्कादायक वक्तव्य, म्हणाले…

‘कोरोना महामारीच्या अनेक लाटा येतील कारण…’”; तज्ज्ञांचा धक्कादायक खुुलासा

“नवीन वर्षाचा संकल्प हा महाविकास आघाडी सरकार घालवायचा आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More