‘या’ भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई | राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. थंडी आता निरोप घेण्याच्या मार्गावर असली तरी अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशाराही हवामान खात्याकडून (Weather Department) देण्यात आला आहे. 

राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये हलकीशी थंडी आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

या आठवड्यात अनेक ठिकाणी थंडीचा जोर पाहायला मिळेल. उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा तापमानात घट नोंदवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये जोरदार वारे वाहत आहेत. येत्या काही दिवस थंडीचा मोसम कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, दुसरीकडे, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये एक-दोन ठिकाणी हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-