बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांचा इशारा

वॉशिंग्टन | कोरोना लसीच्या दोन डोसमधील कालावधी वाढवल्याने लोकांना या विषाणूच्या नव्या प्रकारांचा संसर्ग होण्याचा धोका आहे, असं अमेरिका सरकारचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौसी यांनी सांगितलं आहे.

फायझर आणि मॉडर्ना कंपनीच्या लसींमधील दोन डोसमध्ये अनुक्रमे तीन आठवडे व चार आठवडे असे अंतर आहे. हा कालावधी वाढविल्यास कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांचा संसर्ग आणखी फैलावू शकतो, असं फौसी म्हणालेत. ब्रिटनध्येही हे दिसून आलं आहे. मात्र कोरोना लसींचा तुटवडा असल्यास दोन डोसमधील कालावधी वाढवण्यास हरकत नाही, असंही अँथनी फौसी यांनी म्हटलं आहे.

डेल्टा विषाणूची संसर्गशक्ती पूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा 40 ते 50 टक्क्यांनी अधिक आहे. पुरेशा प्रमाणात लसीकरण न झालेल्या देशाला तर या विषाणूमुळे अधिक हानी होऊ शकते. लस न घेतलेल्या लोकांमध्ये डेल्टाची बाधा झाली की, त्याचा प्रसार झपाट्याने होतो. कोरोनावर मात करण्यासाठी शक्य तितक्या लवकर लस देणं हाच प्रभावी उपाय आहे, असं फौसी म्हणाले.

भारताने गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत कोरोना लसीच्या दोन डोसमधील कालावधी दोनदा वाढविला. मार्चमध्ये कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवसांवरून सहा ते आठ आठवडे करण्यात आले. त्यानंतर हे अंतर 12 ते 16 आठवडे झाले. कालावधीतील वृद्धीमुळे लसीची परिणामकारकता वाढते, असे केंद्र सरकारकडून त्यावेळी सांगण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

“2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू”

कोपर्डी पीडितेला स्पेशल बेंच तयार करुन 6 महिन्यात न्याय द्या- खासदार संभाजीराजे

‘पाच, सहा बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो, माझ्यावरील निर्बंध हटवण्यास सांगा मग मी.. ‘; करूणा मुंडेंचा गौप्यस्फोट

प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर भुवन बामच्या आई-वडिलांचं कोरोनाने निधन

महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात; नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More