बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑनलाईन बँकिंग करत असाल तर सावधान; बँकेच्या ‘या’ चुकीचा तुम्हाला बसू शकतो मोठा फटका

नवी दिल्ली | स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक, अ‍ॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक मध्ये आपले खाते असल्यास आपल्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे. कारण येत्या काही दिवसांत तुम्हाला बँकिंग सेवांमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 27 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत बँका 7 दिवस बंद राहणार आहेत, मात्र परंतु यादरम्यान आणखी एक चिंताजनक बातमी अशी आहे, की आपल्याला ऑनलाईन बँकिंगमध्ये देखील अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

नागरिकांना फसव्या एसएमएसपासून वाचवण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत.  एसएमएस नोंदणी तसेच व्यावसायिक संदेशांवर अंकुश ठेवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ग्राहकांना योग्य संदेश पाठवणं आणि त्यांना कोणत्याही फसवणुकीला बळी पडण्यापासून वाचवणं हे या निर्णयाचं उद्दिष्ट आहे. बर्‍याच कंपन्यांनी ट्रायच्या या आदेशानंतरही गांभीर्याने पावलं उचलेली नाहीत. ज्याचा फटका त्यांच्या ग्राहकांना सहन करावा लागू शकतो. 1 एप्रिल 2021 पासून आवश्यक नियमांची पूर्तता न केल्यास ‘स्क्रबिंग प्रक्रिये’मध्ये तो संदेश अयशस्वी होईल व सिस्टममधून नाकारला जाईल.

ट्रायने अशा 40 डिफॉल्ट कंपन्यांची यादी जाहीर केली असून त्यात एचडीएफसी बँक, एसबीआय आणि आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक यासारख्या बड्या बँकांचा समावेश आहे. ट्रायच्या वारंवार सूचनेनंतरही या सर्व प्रमुख संस्था बल्क कमर्शियल एसएमएसच्या नियमांचं पालन करत नाहीत. कंपन्यांनी आपले आदेश न पाळल्याचं पाहून ट्रायने आता त्यांच्यावर कडक कारवाई सुरू केली आहे. नियामकाने या सर्व डीफॉल्ट कंपन्यांना असा इशारा दिला आहे, की त्यांनी त्यांच्या ग्राहकांना ओटीपी येण्यास अडचणी येऊ नयेत यासाठी त्यांनी 1 एप्रिल 2021 पर्यंत आदेशाचं पालन केलं पाहिजे.

दरम्यान, ट्राय असं नमूद करते की संबंधित मोठ्या बँका टेम्पलेट आयडी, पीई. आयडी आणि अशा इतर आवश्यक गोष्टींचा वापर करत नाहीत. अशा परिस्थितीत जर या बँकेच्या ग्राहकांनी कोणतेही ऑनलाइन व्यवहार केले तर त्यांना ओटीपी मिळणार नाही, कारण एसएमएस स्क्रबिंग प्रक्रियेत या सर् बँकांना ओटीपी संदेशाद्वारे किंवा इतर कोणत्याही महत्त्वपूर्ण संदेश प्रणालीद्वारे नकार दिला जाईल.

थोडक्यात बातम्या- 

दिपाली चव्हाण यांचा छळ करणाऱ्या अधिकाऱ्याला सरकारचा झटका, केली ही कारवाई!

‘चूक असेल तर मान्य करायला काहीच हरकत नाही’; शशी थरूर मोदींना म्हणाले ‘SORRY’

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटलांना धक्का!

शेवटी प्रेम ते प्रेमच! पत्नीच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासात पतीनेही सोडले प्राण

‘या’ वयोगटातील व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More