बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘एवढ्या मोठ्या क्रुझमध्ये फक्त आर्यन फिरत होता का?’ आर्यनच्या अटकेवर मिका सिंहचा सवाल

मुंबई | सध्या मुंबईत एनसीबीनं टाकलेल्या छाप्यात अनेकांना ड्रग्ज घेताना अटक करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे शाहरुख खानच्या मुलाला अटक केल्यानंतर संपूर्ण देशभरात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. त्याच्या अटकेनंतर सगळ्याच क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहे. अशातच आता प्रसिद्ध गायक मिका सिंहनंही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मिका सिंहनं आर्यनच्या अटकेवर सवाल केला आहे. ‘वाह काय सुंदर काॅर्डेलिया आहे. माझीही इच्छा होती तिथे जायची. मी ऐकलं की बरेच लोक तिथं होते पण मला आर्यन सोडून कोणीही दिसलं नाही. एवढ्या मोठ्या क्रुझमध्ये फक्त आर्यन फिरत होता का? शुभ प्रभात, एक अद्भुत दिवस आहे.’ असं मिका सिंहनं म्हटलं आहे.

आर्यनच्या अटकेनंतर शाहरुख खानच्या अडचणींमध्ये वाढ झालेली पहायला मिळत आहे. यातच अनेक कलाकार पुढे येत शाहरुखला आणि आर्यनला पाठिंबा देताना दिसत आहे. तर काही कलाकारांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आपल्या मुलाच्या अटकेवर शाहरुख खान काय प्रतिक्रिया देईल याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे शाहरुख याप्रकरणी काय प्रतिक्रिया देईल हे महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

“प्रत्येक नागरिकाला आयुष्मान योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी माझी”

आज जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीचा निकाल; कोणाचं पारडं होणार जड?

अन् ‘या’ केंद्रीय मंत्र्याने थेट शरद पवारांना नाकारली भेट; काय आहे कारण?

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More