Top News पुणे महाराष्ट्र

“भाजपचे सत्ताधिकारी पदाधिकारी तेव्हा झोपले होते का?”

पुणे | आंबील ओढ्यालगतच्या संरक्षक भिंतीच्या कामासाठी राज्य शासनाकडे 300 कोटी रुपयांची मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटही घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावरुन राष्ट्रवादीनं भाजपवर निशाणा साधला आहे.

पूर येऊन दोन वर्षे उलटली, त्या काळात महापालिकेत आणि राज्यातही भाजप सत्तेवर होते. तेव्हा भाजपचे सत्ताधारी पदाधिकारी झोपले होते का? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य प्रदीप देशमुख यांनी केला आहे.

देशमुख म्हणाले की, “पुण्यामध्ये सप्टेंबर 2019 मध्ये महापूर आला. ओढ्याकडेच्या संरक्षक भिंती पडून पुराचे पाणी शेकडो सोसायट्यांत शिरले. पावसाची चाहूल लागल्यावर अजूनही येथील रहिवाशांना धास्ती वाटते. आंबील ओढ्याच्या पुराचे पाणी सोसायट्यांमध्ये शिरले त्या काळात महापालिकेत आणि राज्यातही सत्तेवर असताना आपण काय केले हे आधी सांगा. मात्र, महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने दोन वर्षे काहीही केले नाही.”

प्रायमूव्ह इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि. या सल्लागार कंपनीची नियुक्ती केली, त्यांनी 281 कोटी रुपयांचा अहवाल दिला होता. त्याप्रमाणे स्थायी समितीने 77 कोटी रुपयांची निविदा प्रक्रियाही राबविली होती. मात्र, ही कामे झालीच नाही. त्यावेळी कोरोनाचे संकटही नव्हते. त्यामुळे त्यामागे लपायलाही भाजपला जागा नसल्याचंही प्रदिप देशमुख यांनी म्हटलं आहे

थोडक्यात बातम्या-

औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात आदित्य ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

धक्कादायक! पाण्याच्या टाकीत आढळला 7 वर्षाच्या मुलाचा मृतदेह

विराट-अनुष्काला मुलगा होणार की मुलगी?; ज्योतिषानं केली ‘ही’ भविष्यवाणी

कोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च केंद्र सरकारने करायला हवा- राजेश टोपे

“संभाजी महाराज आम्हाला माफ करा, तुमच्या महाराष्ट्रामध्ये ह्या नीच औलादी जन्माला आल्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या