बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाबरी मस्जिद पाडण्यासाठी एक तरी शिवसैनिक होता का?”

कोल्हापूर | शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यानिमित्त संबोधित केलं. सन्मुखानंद सभागृह येथे बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तुफान फटकेबाजी केली आहे. उद्धव ठाकरे यांचं भाषण संपल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली.

दसरा मेळाव्यात संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी बाबरी मस्जिद पाडण्यासाठी शिवसेना सर्वात पुढे होती, असं म्हटल होतं. त्यावरून आता चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मस्जिद पाडण्यासाठी एक तरी शिवसैनिक होता का? असा सवाल केला आहे. तसेच राम मंदीर तुम्ही बांधलं का? असाही सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

भाषणात मुख्यमंत्र्यांनी भाजप उपऱ्या उमेदवारांना उमेदवारी देतो. देशातला सर्वात मोठा पक्ष असूनही यांच्याकडे स्वत:चे उमेदवार नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. त्यावरूनही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.  शिवसेनेने 164 जागा लढवल्या त्यापैकी 34 जागा शिवसेना भाजपचे उमेदवार घेऊन लढली आहे, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. जे तुम्ही केलेतं ते तुम्ही विसरला आहात, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, यावेळी पत्रकार परिदेषत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी औकातीत राहायचं, असा इशारा दिला आहे. माझी लायकी पाहण्यासाठी मोदी शहा समर्थ आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

फक्त 2 धावांनी हुकली चेन्नईच्या ‘या’ खेळाडूची ऑरेंज कॅप

छोटा राशिद खान! खुद्द सचिन तेंडुलकरने व्हिडीओ शेअर करत केलं कौतूक; पाहा व्हिडीओ

‘गृहमंत्रिपद म्हटलं की माझा बीपी वाढतो’, अजित पवारांनी सांगितला जयंत पाटलांचा किस्सा

“एकाला बाहेर काढा मग, आपोआप देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील”

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More