बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भर मैदानात वाॅशिंग्टन सुंदर आणि जाॅनी बेअरस्टो भिडले, अन्…

अहमदाबाद | भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी-ट्वेन्टी सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताचा 8 गडी राखून दाणून पराभव झाला. पाहुण्यासंघाने हा संपूर्ण सामना एकतर्फी खिशात घातला. भारताचा गोलंदाज वाॅशिंग्टन सुंदर आणि इंग्लंडचा फलंदाज जाॅनी बेअरस्टो यांच्यात झालेल्या बाचाबाचीमुळे हा सामना चर्चेत आला.

भारत पराभवाच्या उंभरठ्यावर उभा असताना वाॅशिग्टन सुंदर गोलंदाजी करायला आला. त्यानं पहिल्याच चेंडूत जेसन राॅयचा बळी घेतला. त्यानंतर भारताच्या आशा वाढल्या. 14 वं षटक चालू असताना सुंदर पुन्हा गोलंदाजी करायला आला. या षटकाच्या शेवटच्या चेंडूत इंग्लंडच्या मलनने सरळ चेंडू मारला. चेंडू हवेत गेल्यावर सुंदरने झेल घेण्याचा प्रयत्न केला. परंतू जाॅनी बेअरस्टो धाव घेण्याच्या नादात पुढे आला.

त्यानंतर जाॅनी बेअरस्टो आणि सुंदरची धडक झाली. या धडकेत झेलही सुटला आणि बेअरस्टोलाही धाव घेता आली नाही. त्यानंतर सुंदर त्याच्यावर भडकला. दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर अंपायरने मध्यस्थी करून दोघांना बाजूला केले. यष्टीरक्षक पंतही यामध्ये येऊन थांबला. सुंदर जेव्हा पुन्हा पुढचा षटक घेऊन आला. त्यानंतर सुंदर स्वतः जाऊन बेअरस्टोशी बोलला आणि त्यानंतर दोघेही हसले.

दरम्यान, या सामन्यात रिषभ पंतचा रिव्हकर्स स्विप एक चर्चेचा विषय ठरला होता. त्यानं जोर्फा आर्चरच्या फास्ट बाॅलला रिव्हकर्स स्विप मारून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे. तर के.एल, राहूलने एक अफलातून षटकार उडी मारून रोकला. या सामन्यात भारतीय फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय राहिली नाही. मात्र या सामन्यात भारतीय खेळाडूंनी क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

“आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा, तेल स्वस्त झालंय का?”

“लॉकडाऊनपेक्षा मृत्यूदर कसा कमी करता येईल याचं नियोजन करा”

“नरेंद्र मोदी भगवान शंकराचा अवतार आहेत, त्यांनीच देशाला कोरोनापासून वाचवलं”

राज्यात कोरोनाचा उद्रेक; आजची आकडेवारीही अत्यंत धक्कादायक

’21 तारखेला जर परीक्षा झाली नाही तर…’; गोपीचंद पडळकरांंचा राज्य सरकारला इशारा

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More