देश

“वारिस पठाणांच्या वक्तव्यामुळे दिल्ली पेटली”

Loading...

नवी दिल्ली | नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यावरुन राजधानी पेटली आहे. सीएएवरुन सुरु झालेल्या दंगलीत अनेक जणांनी आपला जीव गमावला आहे. या पार्श्वभूमीवर शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसिम रिझवी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

ईशान्य दिल्लीत उफाळून आलेल्या हिंसाचाराला एमआयएमचे नेते वारिस पठाण कारणीभूत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच वारिस पठाण यांच्या आम्ही 15 कोटी 100 कोटींवर भारी आहोत या वक्तव्याचे पडसाद दिल्लीत उमटत आहेत, असंही ते म्हणाले आहेत.

शाहीनबामध्ये सुरु असणाऱ्या आंदोलनावरही रिझवी यांनी टीका केली आहे. शाहीनबागमधील महिलांच्या अडाणीपणामुळे दिल्लीत हिंसा घडून येत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

सरकार, सीएए आणि देश आपलाच आहे. आपसात भांडू नका. सर्वांना हात जोडून विनंती आहे. काँग्रेसच्या विषाचा प्याला पिऊ नये. काँग्रेसच्या जाळ्यात अडकू नका, असंही ते म्हणाले आहेत.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

शाळेची फी भरायलाही पैसे नव्हते; आता झाला देशातील सर्वात तरूण IPS अधिकारी

…नाहीतर पेकाटात नक्कीच लाथ बसेल; ‘सामना’तून भाजपवर टीकास्त्र

महत्वाच्या बातम्या-

अनिल काकोडकरांपेक्षा वर्षा गायकवाड बुध्दीमान आहेत का?; विनोद तावडेंची टीका

ठाकरे सरकारचा भाजपला पुन्हा धक्का; भाजपच्या बड्या नेत्याची नियुक्ती रद्द

“वीर सावरकरांची ढाल! भाजपचा पुळका खोटा”; ‘सामना’तून भाजपवर बाण

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या