बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवींचा मोठा निर्णय; स्वीकारणार हिंदू धर्म

नवी दिल्ली | शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष राहिेलेले वसीम रिझवी (Waseem Rizvi, Former Chairmen Of Shia Wakf Board) नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपण हिंदू धर्मात धर्मांतर करणार असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यानुसार आज ते गाझियाबादमधील दसना देवी मंदिरात हिंदू धर्म स्विकारणार आहेत.

दसना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद गिरी महाराज वसीम रिझवी यांचं धर्मपरिवर्तन करणार आहेत. आज सकाळी 10:30 वाजता ते हिंदू धर्म स्विकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी रिझवी यांनी हिंदू रितीरिवाजानुसार माझ्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत आणि नरसिंहानंद गिरी महाराज यांनी माझ्या चितेला अग्नी द्यावा, अशी इच्छा व्यक्त केली होती.

वसीम रियाझ यांनी काही दिवसांपूर्वी ‘ मला मारण्याचा आणि शिरच्छेद करण्याचा कट रचला जात आहे. मी याचिका दाखल केल्यामुळे मुस्लिम मला मारायचा कट करत आहेत, आणि मला ते कोणत्याच कब्रस्तानात जागा देणार नाहीत. त्यामुळे माझ्यावर हिंदू रितीरिवाजाने अंत्यसंस्कार व्हावेत,’ असं सांगणारा व्हिडीओ शेअर केला होता.

दरम्यान, वसीम रिझवी यांनी कुराणातील 26 श्लोक काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ती याचिका न्यायलायने फेटाळली होती. वसीम रियाझी यांनी याचिका दाखल केल्यापासून ते मुस्लिम संघटनांच्या निशाण्यावर आले आहेत. सोशल मीडियावरूनही त्यांच्याविरोधात मोहीम चालवली जात आहे.

थोडक्यात-

गिरीश कुबेरांवर झालेल्या शाईफेकीवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; वाचा नेमका वाद काय?

ओमिक्रॉनबाधितांच्या तब्येतीबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

“…आता भाजप मत मागायला दारात आल्यावर हे लक्षात ठेवा”

‘या’ महिन्यात Corona ची तिसरी लाट येणार, तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More