बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता ऑनलाईन परिक्षेतही विद्यार्थ्यांवर राहणार वाॅच, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा मोठा निर्णय

पुणे । कोरोना काळात अॅनलाईन परीक्षा पद्धती सुरू झालेल्या आहेत. मात्र या परीक्षेचा विद्यार्थी गैरफयदा घेत असल्याचं पहायला मिळत आहे. याशिवाय काॅपी बहाद्दरांची मस्ती वाढलेली दिसत आहे. याच काॅपी बहाद्दरांना अद्दल घडवण्यासाठी आता त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं घेतला आहे.

यंदा ऑनलाईन परीक्षा चालू असताना स्क्रीनचे रेकाॅर्डिंग केली जाणार आहे. यावेळी कोणताही गैरव्यवहार आढळल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे अशी माहिती विद्यापीठानं दिली आहे. येत्या 15 फेब्रुवारीपासून विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन सुरू होणार आहेत. या परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने सुरू होणार आहेत.

परीक्षा अधिक पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात यामुळे ही पद्धत राबवली जाणारा असल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यामापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली. यामुळे परीक्षा प्रॉक्टर्ड पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी नेमके कशा प्रकारे काॅपी करतात याबाबत सर्व माहिती विभागांना मिळणार आहे.

परीक्षेच्या मोजक्याच गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. काॅपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलाच चाप बसणार आहे. विद्यापीठातील अंध विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा देण्याची मागणी केली तर त्यांचासाठी विशेष व्यवस्था करण्यात येईल, असंही सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

Petrol Diesel Price: जाणून घ्या आजचे ताजे दर

कोरोनाच्या ‘या’ नव्या व्हेरियंटनं चिंता वाढवली, WHO म्हणाले…

‘या’ तारखेपासून पुण्यातील शाळा सुरु होणार, अजित पवारांनी केली मोठी घोषणा

“…त्यामुळे शरद पवार महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत”

“जनाब संजय राऊत फडणवीसांच्या आरोपांमुळे बावचळले आहेत, त्यांचा झिंग झिंग झिंगाट झालाय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More