अहमदाबाद | जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियमवर भारत-इंग्लंड कसोटी सामना खेळला जाणार आहे. अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे. याच मैदानावर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील पुढील दोन सामने खेळले जाणार आहेत. तर याच मैदानात 5 टी ट्वेन्टी सामने देखील खेळवले जातील.
मोटेरा स्टेडियमची क्षमता एक लाख दहा हजार प्रेक्षक मावतील इतकी आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार सध्या फक्त 50% प्रेक्षकांनाच मैदानात परवानगी दिली आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्याला 50 हजारहून अधिक लोक उपस्थित राहू शकतील. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असेल. शिवाय हा सामना गुलाबी चेंडूने खेळवला जाईल. 24 फेब्रुवारीला हा सामना खेळवला जाणार आहे.
भारतीय संघाने 3 दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये एक सामना विदेशात आॅस्टेलियाविरुद्ध झाला त्यात भारताचा पराभव झाला होता. तर दोन सामने मायदेशी खेळवले आहेत. त्यात भारताने बांग्लादेशाविरुद्ध विजय मिळवला होता. दिवस-रात्र कसोटी सामना गुलाबी चेंडूने खेळवला जाणार आहे. त्यामुळे सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.
भारत-इंग्लंड कसोटी सामना आयोजित करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. लवकरच स्थिती सामान्य होऊन पूर्ण क्षमतेेने सामने भरतील, असं गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष धनराज नथवाणी यांनी सांगितले आहे. त्यासोबतच त्यांनी बीसीसीआयचे आभार मानले आहेत.
थोडक्यात बातम्या-
राजकीय कार्यक्रमांवरही लवकरच निर्बंध?, अजित पवारांची महत्त्वाची घोषणा
…तर कठोर निर्णय घ्यावे लागतील; अजित पवारांनी दिले मोठे संकेत
मुंबई-पुण्यानंतर महाराष्ट्रातील ‘या’ भागात कोरोनाचा कहर सुरु
मंत्र्याकडून संसदेतच बलात्काराचा प्रयत्न, महिलेच्या आरोपानं एकच खळबळ
‘कोरोनापेक्षा जास्त घातक भाजप’; खासदार नुसरत जहाँचा भाजपवर निशाणा
Comments are closed.