बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेवटचं खेळताना पाहा; कारण ‘हे’ तीन दिग्गज पुन्हा IPL खेळण्याची शक्यता नाही!

मुंबई | इंडियन प्रीमीयर लीग 2021 स्पर्धा आता तोंडावर येऊन ठेपली आहे. 9 एप्रिलपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याने ‘आयपीएल’च्या या 14व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्व संघांचे खेळाडूला तयारीला लागले आहेत. अनेक खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. तर काही खेळाडू सध्या क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करत आहेत.

यंदाची ‘आयपीएल’ काही खेळाडूंसाठी शेवटची ‘आयपीएल’ ठरणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. काही खेळाडू पुढची ‘आयपीएल’ खेळणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात अनुभवी यष्टिरक्षक सनराइजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा, चेन्नई सुपर किंग्सचा इमरान ताहीर आणि किंग्स इलेव्हन पंजाबचा युनिव्हर्स बाॅस ख्रिस गेल यांचा समावेश आहे.

स्पर्धा सुरू होण्याआधी प्रथम कोलकाता नाइट रायडर्सचा फलंदाज नितीश राणा आणि आज दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सर्वाधिक संख्या महाराष्ट्र आणि मुंबईत आहेत.

दरम्यान, ‘आयपीएल’चे आयोजन करणाऱ्या ‘बीसीसीआय’ला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत दोघा खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पण यापेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे मुंबईतील वानखेडे मैदानावरील 8 ग्राउंड स्टाफला कोरोनाची लागण झाली आहे. या मैदानावर 10 ते 25 या कालावधीत आयपीएलच्या 10 सामन्यांचे आयोजन होणार आहे.

Image result for saha srh

Image result for tahir csk

थोडक्यात बातम्या – 

“तुमचे चेहरे पाहून जगात कोरोना नसल्याची खात्री पटली, मीही मास्क काढून बोलतो”

महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा कोरोनाचं नवं हॉटस्पॉस्ट; एकाच दिवसात 10 हजार रुग्ण!

राहुल तेवतियाचा खतरनाक अंदाज, नेट प्रॅक्टिसचा व्हिडीओ तुफान व्हायरल

अवघ्या 12 वर्षांच्या मुलानं केली आत्महत्या, कारण ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही!

आयुष्याच्या संघर्षाला कंटाळला; पत्नी आणि दोन मुलांना संपवून लिहिली धक्कादायक सुसाईड नोट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More