बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रवाशांनी भरलेल्या बसनं अचानक घेतला पेट, पाहा धक्कादायक व्हिडीओ

हैदराबाद | सध्या सोशल मीडियावर एका भयानक घटनेचा व्हि़डीओ व्हायरल होतोय. प्रवाशांनी भरलेल्या बसने अचानक पेट घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र बस चालकानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे 30 प्रवाशांचा जीव वाचला आहे. बस चालकामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हैदराबादमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे.

घटनेत तेलंगणा स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची बस हनमकोंडा इथून हैदराबादकडे निघाली होती. मात्र ही बस घानपूरजवळ पोहोचताच तिच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. बघता बघता संपूर्ण बसने पेट घेतला.

बसमधून 30 प्रवाशी प्रवास करत होते. प्रवाशांना वेळीच बसमधून खाली उतरवण्यात आलं. यानंतर बस पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे 30 प्रवाशांचा जीव वाचला आहे. यादरम्यान कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली असून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं कळतंय.

दरम्यान, सर्वांनी मिळून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र बसने आणखी पेट घेतला आणि क्षणात बस पूर्ण जळाली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायर होतोय.

चालत्या बसनं अचानक घेतला पेट

Originally tweeted by Kiran Pharate (@PharateKiran) on 24/07/2021.

थोडक्यात बातम्या-

सरकारी कर्मचाऱ्यांनो फोनवर बोलताना आता नीट बोला, ‘या’ 9 सूचना पाळाव्या लागणार!

चक दे इंडिया! टोकियो ऑलिम्पिकमध्ये रोमहर्षक लढतीत भारताची विजयी सलामी

पुढील 3 दिवस अत्यंत धोक्याचे, महाराष्ट्रातील ‘या’ भागाला गंभीर इशारा

“…तर ते स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणत आहेत”

लसीकरण केंद्रावर महिलांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More